Terrorist : ‘अबू उस्मान अल काश्मिरी’ दहशतवादी घोषित | पुढारी

Terrorist : 'अबू उस्मान अल काश्मिरी' दहशतवादी घोषित

पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली, दि. 5, Terrorist : अफगाणिस्तानात लपून बसलेल्या एजाज अहमद अहंगर उर्फ अबू उस्मान अल काश्मिरी याला केंद्र सरकारने दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. श्रीनगरमध्ये जन्मलेला अहंगर दीर्घकाळापासून सुरक्षा दलांना चकवा देत आहे. गैरकृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार त्याला दहशतवादी घोषित करण्यात आले आहे.

Terrorist : काश्मीर खोऱ्यातील लोकांनी ‘इस्लामिक स्टेट जम्मू काश्मीर‘ अर्थात आयएसजेकेमध्ये सामील व्हावे, यासाठी तो माथी भडकावित आहे. दहशतवादी कृत्यांसाठी लोकांची भरती करणे तसेच त्यांना प्रशिक्षण देणारा अहंगर कित्येक वर्षे काश्मीर खोऱ्यात सक्रिय होता. त्याला कित्येक वेळा अटकही झाली होती. मात्र 1996 साली सुटका झाल्यापासून तो फरार आहे. आजही जम्मू – काश्मीरसाठी तो मोठा धोका आहे. या पार्श्वभूमीवर त्याला आता दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले आहे.

Terrorist : अफगाणिस्तानात 2020 मध्ये गुरुद्वारावर भीषण दहशतवादी हल्ला झाला होता. त्या हल्ल्याची अफगाणी गुप्तचर संस्थांनी चौकशी केल्यावर अहंगरचे नाव समोर आले होते. इस्लामिक स्टेट फाॅर खुरासान प्रोवि्हन्सचा प्रमुख, त्याचे साथीदार तसेच अहंगर या हल्ल्यात सामील होते. गुरुद्वारावरील हल्ल्यात 25 शीख लोक मृत्यूमुखी पडले होते. या हल्ल्यानंतर भारत आणि अफगाणिस्तान दरम्यानचे संबंध तणावपूर्ण बनले होते.

हे ही वाचा :

तामिळनाडूतील प्राचीन मंदिर अनुसूचित जातींसाठी खुले !

Rohit Pawar Tweet : #’जी’ वरून रोहित पवार यांचा बावनकुळे यांच्यावर निशाणा, केले खोचक ट्विट

Back to top button