११ वर्षे ‘लिव्ह इन’ मध्ये राहिले अन् ‘ती’ इन’मध्ये साडेचार लाखांचा ऐवज घेऊन मिस्त्रीसोबत पळाली | पुढारी

११ वर्षे 'लिव्ह इन' मध्ये राहिले अन् 'ती' इन'मध्ये साडेचार लाखांचा ऐवज घेऊन मिस्त्रीसोबत पळाली

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा :  २०११ ला दोघे समदु:खी एकत्र आले. समाज नाव ठेवेल म्हणून बाँड बनवून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. तेव्हा त्यांचे वय ५०, तर तिचे ३५ वर्षे होते. आता ते ६० वर्षांचे अन् ती ४५ वर्षांची आहे. एमएसईबीत वॉचमन असलेले ते रिटायर्ड होताच, तुम्ही माझ्या कामाचे राहिले नाही, म्हणून तिने ओळखीच्या मिस्त्रीसोबत सूत जुळविले आणि एटीएम कार्ड, दागिने व चार ते साडेचार लाखांचा ऐवज घेऊन पोबारा केला. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने ३ जानेव- रीला छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीमा (काल्पनिक नाव) आणि सेफ गुलाब शहा (३५, रा. कुरेशी मोहल्ला, दौलताबाद) अशी आर- पींची नावे आहेत. आसेफ हा मिस्त्री आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी नवनाथ (वय- ६१, काल्पनिक नाव) हे एमएसईबीत वॉचमन होते. ते सेवानिवृत्त झाले आहेत. दरम्यान, १९९१ मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यांना दोन मुली आहेत. मात्र, पत्नीशी पटत नसल्यामुळे २०११ मध्ये ते विभक्त झाले. दरम्यान, आरोपी सीमा हिचा पतीही सरकारी नोकरीत आहे. त्यांच्याशी पटत नसल्याने तीही वेगळे राहत होती. २०११ मध्ये सीमा आणि नवनाथ यांची भेट झाली. दोघे समदु:खी असल्याने ते पडेगावमध्ये लिव्ह इनमध्ये राहू लागले.

सीमाचा पती सरकारी नोकरीत असल्याने फारकत घेतल्यास मोठी रक्कम मिळेल, असे आमिष दाखवून तिने नवनाथचा विश्वास संपादन केला. दरम्यान, नवनाथ हे सेवानिवृत्त झाले. त्यांच्या आणि सीमाच्या वयात मोठा फरक असल्याने ती वेगळा विचार करू लागली. तुम्ही माझ्या कामाचे नाहीत, असे त्यांना वारंवार म्हणू लागली. सेवानिवृत्तीचे २६ लाख रुपये आल्यावर नवनाथ यांनी घराचे बांधकाम सुरू केले. ते काम आसेफ शहा याला दिले. सीमाने त्याच्यासोबत सूत जुळवून घेत नवनाथला फसवायला सुरुवात केली. पळून जाण्याच्या रात्री २५ जुलैला त्यांनी नवनाथला मारहाण करून एटीएम कार्ड, सोन्याचे दागिने आणि साडेचार लाख रुपये रोकड लंपास केली. या प्रकरणी नवनाथ यांनी छावणी पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. मात्र, पोलिसांनी गुन्हा नोंदविला नाही. अखेर, न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला.

Back to top button