दारू पिऊन रात्री २ वाजता कर्मचाऱ्याने केला मेसेज; बॉसनेही दिलं भन्नाट उत्तर, स्क्रिनशॉट व्हायरल

दारू पिऊन रात्री २ वाजता कर्मचाऱ्याने केला मेसेज; बॉसनेही दिलं भन्नाट उत्तर, स्क्रिनशॉट व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : नशेत कोणतेही काम करू नये, असे सांगितले जाते. विशेषकरून जर ही गोष्ट तुमच्या नात्याशी किंवा ऑफिसशी संबंधित असेल तर ती अजिबात करू नये. कारण बहुतेक लोकांचा नशेत संयम सुटतो, ते विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता गमावतात. या परिस्थितीत ते काहीही करू शकतात. ज्यामुळे नंतर खूप नुकसान होऊ शकते. पण एका कर्मचाऱ्याने नशेत असताना थेट बॉसलाच मेसेज केला.

'बॉस मी दारु प्यायलोय' असा मेसेज एका कर्मचाऱ्याने मद्यधुंद अवस्थेत आपल्या बॉसला रात्री २ वाजता केला. बॉसनेही त्याच्या मेसेजला भन्नाट असं उत्तर दिलं आणि चॅटिंगचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर शेअर केला.

वन इम्प्रेशनचे मुख्य अभियंता सिद्धांत यांनी ट्विटरवर हा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्यांच्या एका कर्मचाऱ्याने मद्यधुंद अवस्थेत मेसेज पाठवले होते. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, "एक्स गर्लफ्रेंडकडून नशेत मेसेज येणे ठीक आहे, पण नशेत असताना तुम्हाला असे मेसेज कधी आले आहेत का?" व्हायरल चॅटिंगमध्ये कर्मचाऱ्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने म्हटले आहे की, "बॉस मी ड्रिंक केलं आहे. पण मी नेहमी म्हणतो की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आहे. याबद्दल धन्यवाद, चांगली कंपनी शोधण्यापेक्षा चांगला बॉस शोधणे कठीण आहे. मी भाग्यवान आहे, म्हणून तुमचं कौतुक होणं गरजेच आहे." हे मेसेज ४ ऑगस्ट रोजी शेअर करण्यात आले आहेत.

या चॅटिंगचा स्क्रिनशॉट व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजर्सने लिहिले की, "खरोखर तुम्ही एक अद्भुत बॉस व्हाल" प्रत्युत्तरात सिद्धांत यांनी म्हटलं आहे की, माझ्याकडे अप्रतिम टीम आहे. दुसर्‍या युजरने लिहिले, "स्वप्नासारखे" यावर सिद्धांतने रिप्लाय देताना म्हटलं आहे की, "मलाही ते मेसेज पहाटे २ वाजता मिळाले त्यामुळे ते स्वप्नवतच वाटले." या एका मेसेजने सोशल मीडियावर सकारात्मकतेची लाट पसरली आहे. चांगले बॉस आणि कर्मचारी यांच्यातील संबंध किती मजबूत असू शकतात हे दाखवतो. असा बॉस मिळाल्याने कोणताही कर्मचारी स्वतःला भाग्यवानच समजेल.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news