Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांवर प्रथमच गुन्हा दाखल | पुढारी

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांवर प्रथमच गुन्हा दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क : मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकेरी आणि खालच्या भाषेत टीका केल्यानंतर आतापर्यंत सबुरीचे धोरण बाळगत असलेले राज्य सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे. यापूर्वी पोलिसांकडून मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. परंतु, सोमवारी पहिल्यांदाच पोलिसांकडून थेट मनोज जरांगे यांच्यासह ५९ आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

बीड जिल्ह्यातील शिरूर आणि अमळनेरमध्ये जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. रास्ता रोकोसाठी लोकांना प्रवृत्त केल्याचा आणि जमावबंदी आदेश मोडल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आल्याचे समजते.

पोलिसांनी मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरंगे पाटील यांच्याविरुद्ध कलम ३४१,१४३,१४५,१४९,१८८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मनोज जरंगे पाटील यांनी बीडमध्ये सर्वसामान्यांना रस्ता रोको करण्यासाठी चिथावणी दिल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय झाली. बीडमध्ये इतर २५ ठिकाणी ट्रॅफिक जाम झाले, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले असल्याचे बीडचे पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली.

महाराष्ट्राचा पुन्हा दौरा करणार

आपल्या उपोषणाचे साखळी उपोषणात रूपांतर करीत आहोत. संभाजीनगर येथे उपचार घेतल्यानंतर आपण पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार आहोत, असे जरांगे यांनी स्पष्ट केले. आपण कुठेही रास्ता रोको केलेला नसताना गुन्हे दाखल झाले आहेत. प्रत्येक वेळी सरकारने पोलिसांचा वापर केला तर जनता ऐकणार नाही, असे ते म्हणाले.

हेही वाचा : 

Back to top button