मुख्यमंत्री, जरांगे यांच्यातील बोलणी जाहीर करा : पटोले | पुढारी

मुख्यमंत्री, जरांगे यांच्यातील बोलणी जाहीर करा : पटोले

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ, असे सांगत कुणबी प्रमाणपत्र वाटून ओबीसी आरक्षणाला धक्का लावला गेला. मराठा समाजाच्या आरक्षणावर शिंदे-फडणवीस-पवार सरकारने फसवणूक केली असून आरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्र पेटवण्याचे पाप केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात नेमके काय चालले आहे, हे सरकारने स्पष्ट करावे आणि मुख्यमंत्री व जरांगे यांच्यात काय चर्चा झाली ते जाहीर करा, असे थेट आव्हान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

मराठा आरक्षणावरून नाना पटोले यांनी अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी पत्रकारांशी संवाद साधताना सरकारवर तोफ डागली. मराठा आरक्षण मविआ सरकारने टिकवले नाही, असा आरोप सरकारमधले लोक करत आहेत. परंतु, महाविकास आघाडी सरकार असताना मराठा आरक्षण उपसमितीत एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण होते, अजित पवारही होते. मग मराठा आरक्षण आघाडी सरकार टिकवू शकले नाही तर त्याला हे लोकही जबाबदार नाहीत का, असा सवाल त्यांनी केला.

Back to top button