Sharad Pawar NCP Tutari Sign : सत्ताधाऱ्यांना हाकलण्यासाठी तुतारी हा शुभ संकेत : विजय वडेट्टीवार | पुढारी

Sharad Pawar NCP Tutari Sign : सत्ताधाऱ्यांना हाकलण्यासाठी तुतारी हा शुभ संकेत : विजय वडेट्टीवार

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : शरद पवार यांच्या पक्षाने तुतारी चिन्ह वाजवण्यासाठीच घेतले आहे. सत्ताधारी यांना राज्यातून बाहेर हाकलून लावण्यासाठी शरद पवारांनी तुतारी हाती घेतली आहे. मुळात आनंदाच्या क्षणी तुतारी वाजवली जाते, हा शुभ संकेत आहे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. (Sharad Pawar NCP Tutari Sign)

संबंधित बातम्या : 

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितला सोबत घेण्यासाठी आमचे शर्थीचे प्रयत्न सूरू आहेत. त्यांच्यासोबत राहण्यासाठी ते म्हणतील त्याप्रमाणे चर्चेला तयार आहोत. प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. चर्चेच्या फेऱ्या शेवटपर्यंत चालत असतात, आम्ही घाई न करता आघाडीची काय भूमिका आहे, त्यावरून आमचं ठरवू, असे ते म्हणाले. जिथे नंबर दोन वर होते, मात्र आता ज्यांना उमेदवारी मिळणार नाहीत. त्यापैकी बरेच जण आमच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला. (Sharad Pawar NCP Tutari Sign)

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले. हेडमास्तर सारखी त्यांची भूमिका होती. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत ते निष्ठेने सेवा करत राहिले. मला त्यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली. मी १९८६ चा शिवसैनिक आहे. ते नेहमी बाळासाहेबांना सांगायचे की, विजयला आमदार करायचं आहे. १९८८ मध्ये माझी शिफारस केली आणि महामंडळाच्या यादीत माझं पहिलं नाव देऊन १९९५ साली मंत्री केले अशी आठवण वडेट्टीवार यांनी काढली. शिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी करणारे, उत्तम मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात समर्पित नोंद असलेल्या नेत्याला महाराष्ट्र आज मुकला असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

हेही वाचा : 

Back to top button