गुजरातमध्ये १२० कोटींचे ड्रग्ज जप्त; द्वारका येथे पुन्हा कारवाई | पुढारी

गुजरातमध्ये १२० कोटींचे ड्रग्ज जप्त; द्वारका येथे पुन्हा कारवाई

अहमदाबाद, पुढारी ऑनलाईन

गुजरातमध्ये ड्रग्ज सापडण्याचा सिलसिला सुरू असून द्वारका येथे पुन्हा एकदा १२० कोटी रुपयांचे २४ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. एटीएसने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी तिघांना पथकाने ताब्यात घेतले आहे.

काही दिवसांपूर्वीच गुजरातच्या मुंब्रा बंदरातून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केले होते. त्यानंतर द्वारका येथूनही मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केले होते. तसेच मोरबी जिल्ह्यातील एका गावातून एटीएसने १२० किलो ड्रग्ज जप्त केले. त्याचे बाजारमूल्य जवळपास ६०० कोटी रुपये आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एटीएसने आज पुन्हा एकदा कारवाई केली. या प्रकरणाचे धागेदोरे पंजाब, राजस्थान आणि महाराष्ट्रापर्यंत आहेत.

पंजाबच्या फरिदाकोट तुरुंगात असलेला भूषण शर्मा उर्फ भोला शूटर तुरुंगातूनच अमली पदार्थांचं रॅकेट चालवत होता, असे एटीएसच्या ताब्यात असलेल्या आरोपीने सांगितले. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. नवलखी बंदराजवळ असलेल्या जिनजुदा गावाजवळून जवळपास १२० किलोचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.

हेही वाचा : 

Back to top button