नागपूर : पुढारी वृत्तसेवा – उद्धव ठाकरे यांच्या चुकीमुळेच महाराष्ट्राला आज हे दिवस पहावे लागत आहेत. मराठा आरक्षण संदर्भातला जो काही घोळ निर्माण झाला आहे, जे परिणाम महाराष्ट्र भोगत आहे, याला जबाबदार उद्धव ठाकरे आहेत. उद्धव ठाकरे यांना आता बोलण्याचा अधिकार नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच त्यांना सर्वोच्च न्यायालयात योग्य भूमिका मांडता आली असती. मात्र, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी काहीच केले नाही, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
संबंधित बातम्या –
विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी भाजप सरकारवर आरोप केले याकडे लक्ष वेधले असता, ही आग उद्धव ठाकरे यांनी लावली आहे. जेव्हा मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात होता, तेव्हा वडेट्टीवार हे देखील उद्धव ठाकरे सरकारमध्ये मंत्री होते. तेव्हा त्यांनी काही का केले नाही? आता एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे, त्यास सर्वांनी साथ दिली पाहिजे. संजय राऊत यांना उत्तर नितेश राणे देतीलच. मात्र, या प्रकरणी केंद्र सरकारची सध्या भूमिका नाही. पहिले राज्य त्यांच्या बाजूने जे काही आहे ते करायचे आहे. त्यानंतर केंद्र सरकारची भूमिका आहे असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
कोअर कमिटीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी जी पावले उचलली आहेत, जे प्रयत्न केले जात आहेत, त्याला भाजपचा पूर्ण पाठिंबा असल्याचे कालच्या मीटिंगमध्ये निश्चित करण्यात आले. मराठा आरक्षण मिळायलाच पाहिजे, यासाठी भाजप पूर्ण सहकार्य सरकारला करेल. जे जे सरकारला करावे लागेल ते करणार असून सरकारला लागणारे संपूर्ण समर्थन एक पक्ष म्हणून भाजप देईल. एकनाथ शिंदे जे काही निर्णय घेतील त्यास भाजप पूर्ण पाठिंबा देणार आहे, असेही सांगितले.