Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक; पण हिंसेला थारा नाही : देवेंद्र फडणवीस | पुढारी

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक; पण हिंसेला थारा नाही : देवेंद्र फडणवीस

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. सरकार त्या धोरणातून पावले उचलत आहे. जिथे शांततेत आंदोलन सुरु हे तिथे कोणतेही कारवाई केली जाणार नाही. शांततेत आंदोलन करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे; पण हिंसेला थारा नाही, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना आज (दि. ३१) स्‍पष्‍ट केले. (Maratha Reservation )

Maratha Reservation : काही लोक आंदोलनाचा गैरफायदा घेत आहेत

राज्यभरात मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा वणवा पेटला आहे. मराठा आरक्षणासाठी आणि सरसकट कुणबी दाखले मिळण्यासाठी मनोज जरांगे-पाटील यांचे आंदोलनाच्या दुसरा टप्पा म्हणून सात दिवसांपासून उपोषण सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आज माध्यमांशी मराठा आंदोलन संदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मराठा आरक्षणाबाबतीत राज्य सरकार सकारात्मक आहे. सरकार त्या धोरणातून पावलेही उचलत आहे; पण काही लोक या आंदोलनाचा गैरफायदा घेवून हिंसा करण्याचा प्रयत्न करत आहेत.विशेषत: बीडमध्ये काही लोकप्रतिनिधींची घरे जाळणे, विशिष्ठ जमातीमधील लोकांची घरे जाळणे असे प्रकार घडले. ज्या लोकांनी या घटना घडवून आणल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई केली जाईल. राज्य सरकाराने याची दखल गंभीरपणे घेतली आहे.

” लोकं घरात असताना घरे जाळण्याचा जो प्रकार झाला. त्याचे फुटेज मिळाले आहे. या प्रकरणातील जवळपास ५०-५५ लोकांची ओळख पटली आहे. जिथे शांततेत आंदोलन सुरु हे तिथे कोणतेही कारवाई केली जाणार नाही. शांततेत आंदोलन करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. पण हिंसेला कुठेही खतपाणी घातलं जाणार नाही. पण दुर्देवाने अशा घटना घडत होत्या, तेव्हा काही राजकीय पक्षांचे नेते त्यासह त्यांचे कार्यकर्तेही यात सहभागी होते.”

हेही वाचा :

Back to top button