छत्रपती संभाजीनगर : २ लाखांसाठी विवाहितेचा छळ, सासरच्या ७ जणांविरोधात गुन्हे | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : २ लाखांसाठी विवाहितेचा छळ, सासरच्या ७ जणांविरोधात गुन्हे

सिल्लोड – लग्नात माहेरच्यांनी काहीच दिले नाही म्हणून माहेराहून दोन लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करून सासरच्या मंडळीने सतत छळ करणे सुरू केले. विवाहितेच्या लग्नानंतर जेमतेम वर्ष दोन वर्षे संसार झाला. त्यानंतर विवाहितेचा सासरच्या लोकांकडून पैशासाठी सतत छळ केला जाऊ लागला. या प्रकरणी सिल्लोड शहर पोलिसांनी सासरच्या पाच जणांच्या विरोधात ८ सप्टेंबर शुक्रवार रोजी दुपारी गुन्हे दाखल केले.

महिलेला सासरची मंडळी पती शेख अजहर फक्रोद्दीन, शेख रफिया बानो फक्रोद्दीन, शेख फक्रोद्दीन राफीयोद्दीन, शाईन इरफान शेख, हुमेरा तहेसीब मोमीन, समीना रफिक शेख, तोहेसीब इस्माईल मोमीन सर्व रा. भिवंडी या सासरच्या सात जणांच्या विरोधात सिल्लोड शहर पोलिसांनी ४९८ नुसार गुन्हे दाखल केले.

विवाहिता शेख अमरीन हिचे लग्न सन २०२० मध्ये झाले होते काही दिवस संसार सुखात चालला. त्यानंतर सासरच्या मंडळीने तिला त्रास देणे सुरू केले. माहेराहून पैशाची मागणी केली माहेरच्या लोकांनी मागणी पूर्ण न केल्याने सासरच्या मंडळीने विवाहितेला घराबाहेर हाकलून दिले. अखेर त्रासाला कंटाळून विवाहितेने ८ सप्टेंबर रोजी तक्रार केली त्यावरून पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

Back to top button