Block Feature : ट्विटर लवकरच ब्लॉक फीचर काढून टाकेल; एलॉन मस्क यांची घोषणा

Block Feature
Block Feature

पुढारी ऑनलाईन डेस्क : ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क (Elon Musk ) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर – एक्सच्या संदर्भात नेहमी वादात राहतात.  त्यांनी आता एक नवीन घोषणा केली आहे. ट्विटर – एक्स लवकरच ब्लॉक फीचर काढून टाकेल. मस्क यांनी आपल्या चाहत्याच्या ट्विटला उत्तर देताना माहिती दिली आहे. (Block Feature)

ट्विटरचे (Twitter) मालकी हक्क मिळवल्यापासून ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क नवनवीन फिचर्स आणतं आहेत. (Elon Musk) लॉन  मस्क हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. ट्विटरवर अनेक प्रयोग करत असतात. नुकतेच  एलॉन मस्क यांनी आपल्या चाहत्याच्या ट्विटला उत्तर देताना एक माहिती दिली आहे. ही माहिती ब्लॉक फिचर बाबतीत आहे. त्याने  ट्विटला उत्तर देताना म्हंटलं आहे की, ट्विटर – एक्स  वरून ब्लॉकिंग फिचर काढून टाकण्यासाठी आपण काम करत आहे.

Block Feature : म्यूट आणि ब्लॉकमधील फरक 

ट्विटर – एक्स ने त्यांच्या मदत पेजवर स्पष्ट केले आहे की, ट्विटर आपल्या युजर्सना अनेक साधने प्रदान करत असते. ब्लॉक हे यापैकी एक साधन आहे. ब्लॉक या फिचरमुळे लोक विशिष्ट खात्यांच्या संपर्कापासून दूर राहतात. याद्वारे ते ब्लॉक केलेल्या व्यक्तीचे ट्विट पाहू शकत नाहीत किंवा त्यांना संदेश पाठवू शकत नाहीत. तर, म्यूट वैशिष्ट्य ब्लॉकपेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. तुम्ही एखाद्याला म्यूट केल्यास, तुम्ही तुमच्या फीडमध्ये त्या खात्याच्या पोस्ट लपवता.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news