WhatsApp Edit Message Feature | 'व्हॉट्सअ‍ॅप'ने आणले भन्नाट फिचर; सेंड केलेला मेसेजदेखील करता येणार एडिट | पुढारी

WhatsApp Edit Message Feature | 'व्हॉट्सअ‍ॅप'ने आणले भन्नाट फिचर; सेंड केलेला मेसेजदेखील करता येणार एडिट

पुढारी ऑनलाईन डेस्क : व्हॉट्सअ‍ॅप हे मेटा कंपनीचे इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. व्हॉट्सअ‍ॅप नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवनवीन फिचर लॉन्च करत असते. मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी नुकतीच व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन फिचरची घोषणा केली आहे. युजर्सला त्यांने व्हॉट्सअ‍ॅपवर केलेला मेसेज आता लवकच एडिट (WhatsApp Edit Message Feature) करता येणार आहे. यासाठी रोल आउट सुरू असल्याची माहिती झुकेर बर्ग यांनी फेसबुकवर, तर व्हॉट्सअ‍ॅप ने ट्विटरवरून दिली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ने ट्विटरवरून दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, व्हॉट्सअ‍ॅपवर सेंड केलेला मेसेज यूजर्संना १५ मिनिटांच्या ,कालावधीतच एडिट करता येणार आहे. यामध्ये युजरला मेसेज एडिट करण्यासाठी पाठवलेल्या मेसेजवर प्रेस करून होल्ड करावे लागेल, त्यानंतर एक एडिट ऑप्शन दिसेल, या माध्यमातून आपण केलेला मेसेज एडिट करता येईल, असे म्हटले आहे. अशीच सुविधा पूर्वीपासून वापरात असलेले मेसेजिंग ॲप (WhatsApp Edit) टेलिग्रामला देखील उपलब्ध आहे. यावर तुम्ही पाठवलेला मेसेज एडिट करू शकता.

सध्या या फिचरचे डेव्हल्पमेंट पातळीवर काम सुरू आहे. लवकरच हे व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन एडिट फिचर (WhatsApp Edit Message Feature) यूजर्संना वापरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे फिचर कार्यान्वित होण्यासाठी आणखी काही आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. हे फिचर iPhone आणि Android यूजर्ससाठी एकाचवेळी उपलब्ध होणार असल्याचे देखील कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

येत्या काही आठवड्यात हे फीचर व्हॉट्सअ‍ॅपच्या २ अब्ज युजर्ससाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. सध्या भारतात व्हॉट्सअ‍ॅपचे एकूण 487 दशलक्ष यूजर्स  आहेत. यांच्यासाठी देखील लवकरात लवकर हे फिचर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

हेही वाचा:

Back to top button