मोठा दिलासा: आता व्हॉट्सअ‍ॅप स्पॅम कॉल्सपासून मिळणार मुक्ती; Truecaller घेऊन येत आहे नवीन फिचर | पुढारी

मोठा दिलासा: आता व्हॉट्सअ‍ॅप स्पॅम कॉल्सपासून मिळणार मुक्ती; Truecaller घेऊन येत आहे नवीन फिचर

पुढारी ऑनलाईन: सध्या देशात मोठ्या प्रमाणामध्ये सायबर क्राईमच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. हॅकर्स फ्रॉड करण्यासाठी कॉलिंग, एसएमएस आणि इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप्सद्वारे लोकांशी संपर्क साधत आहेत. आताच्या घडीला स्पॅम करण्यासाठी सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या मेसेजिंग अ‍ॅप्सपैकी एक आहे ते म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप. व्हॉट्सअ‍ॅप हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असून यावरून तुम्ही एकमेकांशी संवाद साधू शकता. तसेच आपले फोटोज, व्हिडिओ देखील शेअर करू शकता. त्याबरोबरच व्हिडीओ आणि व्हॉइस कॉल्सही करू शकता.

भारतामध्ये व्हॉट्सअ‍ॅपचे ५०० दशलक्ष सक्रिय वापरकर्ते आहेत. व्हॉट्सअ‍ॅप वापरताना वापरकर्त्यांना अनेकदा स्पॅमच्या त्रासाला तोंड द्यावे लागते. मात्र, आता व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना स्पॅमपासून वाचवण्यासाठी Truecaller ने मेटाशी हातमिळवणी केली आहे. जेणेकरून वापरकर्त्यांना प्लॅटफ्रॉमवरील स्पॅम मेसेज ओळखण्यात आणि ब्लॉक करण्यात मदत होईल. कॉलर आयडी आणि स्पॅम ब्लॉकिंगसाठी असलेले Truecaller वापरकर्त्यांना इंटरनेटवरून संभाव्य स्पॅम कॉल शोधण्यात मदत करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप आणि इतर मेसेजिंग अ‍ॅप्सवर आयडेंटिफिकेशन सर्व्हिस सुरु करण्याचा विचार करत आहे. हे फिचर मे महिन्याच्या शेवटी जागतिक स्तरावर आणले जाणार असल्याचे Truecaller चे सीईओ अ‍ॅलन मामेदी यांनी सांगितले.

टेलिकॉम रेग्युलेटर असणाऱ्या ट्रायने देखील टेलिकॉम कंपन्यांना ऑफलाइन येणारे स्पॅम कॉल्स आणि एसएमएस ब्लॉक करण्यास सांगितले आहे. यासाठी टेलिकॉम कंपन्या एअरटेल आणि जिओ यांनी आर्टिफिशयल इंटेलिजन्सवर आधारित सेवा रोल आऊट करण्यास सुरुवात केली आहे. Truecaller चे सह-संस्थापक आणि सीईओ अ‍ॅलन मामेदी म्हणाले, भारतामध्ये स्पॅम कॉल्स ही एक मोठी समस्या आहे.

WhatsApp साठी Truecaller चे स्पॅम डिटेक्शन कसे वापरावे ?

Step -1 : Google Play Store वर जाऊन Truecaller बीटा प्रोग्राममध्ये सामील व्हावे.

१. सुरुवातीला google play store वर जाऊं Truecaller सर्च करावे.

२. यानंतर लिस्टिंग पेज स्क्रोल करा आणि बीटा टेस्टर सेक्शनमध्ये जॉईन बटणावर क्लिक करा.

३. काही वेळ थांबून पुन्हा एकदा गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Truecaller सर्च करावे.

४. त्यानंतर Truecaller बीटा अपडेट इन्स्टॉल करा.

Step -2 : WhatsApp आणि अन्य Apps साठी कॉलर आयडी कसे अ‍ॅक्टिव्ह करायचे ?

१. truecaller अ‍ॅप ओपन करून सेटिंग्जमध्ये जावे.

२. त्यानंतर कॉलर आयडीवर क्लिक करा

३. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप आणि इतर मेसेजिंग अ‍ॅप्समध्ये अनोळखी नंबर ओळखण्यासाठी टॉगल चालू करा.

Back to top button