Google New Feature: गुगलने जीमेल, क्रोमवर फ्रॉडपासून वाचण्यासाठी आणले ‘Enhanced Safe Browsing’ फिचर, जाणून घ्या ते काम कसे करणार

Google New Feature: गुगलने जीमेल, क्रोमवर फ्रॉडपासून वाचण्यासाठी आणले ‘Enhanced Safe Browsing’ फिचर, जाणून घ्या ते काम कसे करणार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन: आजकाल ऑनलाइन स्कॅम मालवेअरच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी बाळगणे फार महत्वाचे झाले आहे. हे लक्षात घेऊन Google ने एक नवीन फीचर आणले आहे, जे तुमचे संरक्षण आणखी वाढवेल. तुम्ही जीमेल वापरत असाल आणि गुगलवर सक्रिय असाल, तर तुम्ही कधीतरी एन्हांस्ड सेफ ब्राउझिंगसाठी प्रॉम्प्ट पाहिला असेल. अनेक वापरकर्त्यांना या फीचरबद्दल माहिती नाही. गुगलच्या मते, Enhanced Safe Browsing चा वापर सुरु केल्यास वापरकर्त्यांना धोकादायक वेबसाइट्स, डाऊनलोड आणि एक्सटेंशनच्या विरुद्ध अधिक संरक्षण मिळेल. हे फिचर ऑटोमेटिकली काम करते आणि गुगल क्रोम आणि जीमेलमध्ये तुमची सुरक्षितता वाढवते.

हे प्रॉम्प्ट गेल्या आठवड्यात सुरू झाले आहे. अनेक वापरकर्त्यांना ते दिसत देखील आहे. हे फिचर गुगल वापरकर्त्यांना बनावट वेबसाइट, सॉफ्टवेअर आणि एक्स्टेंशन बद्दल अलर्ट देण्यासाठी आणि रीअल-टाइम सुरक्षा स्कॅनिंग ऑफर करण्यासाठी Enhanced Safe Browsing सक्षम करण्यास अनुमती देते. गुगलच्या म्हणण्यानुसार, यामुळे यूजर्सला गुगल अ‍ॅप्सवरील धोकादायक लिंक्सविरुद्ध चांगली सुरक्षा मिळते.

खालील स्टेप फॉलो करून वापरा 'Enhanced Safe Browsing'

डेस्कटॉपवर गुगल क्रोम ब्राउझरमध्ये Enhanced Safe Browsing वापरण्यासाठी या टिप्स फॉलो करा

प्रथम डेस्कटॉपवर Chrome ब्राउझर उघडा.
आता वरच्या उजव्या कोपऱ्यात येणाऱ्या तीन ठिपक्यांवर क्लिक करा.
आता मेनूमधून सेटिंग्जवर जा.
आता Security and Privacy वर क्लिक करा. तुम्हाला तुमच्या स्क्रीनच्या डाव्या बाजूला हा पर्याय सापडेल.
आता Security वर क्लिक करा.
आता Enhanced Protection वर क्लिक करून त्याला इनेबल करा.

Android डिव्हाइसवर गुगल क्रोम ब्राउझरमध्ये Enhanced Safe Browsing वापरण्यासाठी या टिप्स फॉलो करा

सर्व प्रथम तुमच्या Android डिव्हाइसवर Chrome ब्राउझर उघडा.
आता वरच्या उजव्या कोपर्यात येणाऱ्या तीन ठिपक्यांवर टॅप करा.
आता मेनूमधून सेटिंग्जवर जा.
आता सुरक्षा आणि गोपनीयता वर टॅप करा.
आता Security वर क्लिक करा.
आता Enhanced Protection वर क्लिक करा.

गुगलच्या म्हणण्यानुसार सेटिंग सुरू होण्यासाठी 24 तास लागू शकतात. या फीचरद्वारे तुम्ही तुमचा जीमेल सुरक्षित ठेवू शकता, त्यानंतर तुम्हाला बनावट वेबसाइट्स, सॉफ्टवेअर आणि एक्स्टेंशन आणि धोकादायक लिंक्स टाळण्यासाठी संरक्षण मिळेल.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news