पुणे : पुढारी वृत्तसेवा : इंग्लडमधील वैद्यकीय क्षेत्रातील एमआरसीपी परीक्षेचे स्टडी मटेरियल आणि संभाव्य प्रश्नसंच परीक्षा बोर्डाच्या डेटा बेसमधून मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलेची 14 लाख 97 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी, वानवडी येथील 39 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी डॉ. विल्यम आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपींची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. महिलेला इंग्लडमधील वैद्यकीय क्षेत्रातील एमआरसीपी परीक्षेचे स्टडी मटेरियल हवे होते. त्या वेळी आरोपींनी त्यांना स्टडी मटेरियलबरोबरच परीक्षेचे संभाव्य प्रश्नसंच परीक्षा बोर्डाच्या डेटा बेसमधून मिळवून देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादींना त्यांच्यावर विश्वास वाटला. पुढे विविध कारणे सांगून त्यांनी महिलेकडून तब्बल 14 लाख 97 हजार रुपये घेतले. मात्र, त्यांना स्टडी मटेरियल, प्रश्नसंच दिले नाहीत. दरम्यान फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसात धाव घेत तक्रार अर्ज दिला होता.
हे ही वाचा :