पुणे
पुण्यातून पाच शहरांसाठी नवी उड्डाणे ; या शहरांचा आहे समावेश
पुणे : पुढारी वृत्तसेवा : विमानतळ प्रशासनाने प्रवाशांच्या मागणीनुसार पुण्यातून नवीन 5 उड्डाणे सुरू केली आहेत. ही विमानांची उड्डाणे पुण्यातून कोची, नागपूर, अहमदाबाद, दिल्ली, जोधपूर या पाच शहरांसाठी होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
पुणे विमानतळावरून प्रवास करणार्या प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दिवसाला 180 ते 190 विमानांची दररोज उड्डाणे होत असतात. या वाढत्या प्रवाशांच्या संख्येमुळे जुन्या विमानतळावर प्रवाशांचा भार वाढत असून, प्रशासनाने युध्दपातळीवर काम करून नवीन विमानतळ टर्मिनल सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
अशी आहेत पाच नवी विमान उड्डाणे
पुणे-जोधपूर – आठवड्यातून पाच वेळा (सोम. मंगळ. गुरु. शुक्र. रवि.)
पुणे-कोची – आठवड्यातून एकदा (बुधवारी)
पुणे-नागपूर – शनिवार वगळता आठवड्यातून सहा दिवस
पुणे-अहमदाबाद – आठवड्यातून पाच दिवस (सोम. मंगळ. गुरु. शुक्र. रवि.)
पुणे-दिल्ली – आठवड्यातून एक दिवस
प्रवाशांच्या प्रतिसादामुळे आम्ही पुणे विमानतळावरून नवीन 5 उड्डाणे सुरू केली आहेत. पुण्यातून कोची, नागपूर, अहमदाबाद, जोधपूर, दिल्लीसाठी ही उड्डाणे असून, त्याचे नियोजन करण्यात आले आहे.– संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ

