पुण्यातून पकडलेल्या दोन दहशतवाद्यांना 25 जुलैपर्यंत पोलिस कोठडी | पुढारी

पुण्यातून पकडलेल्या दोन दहशतवाद्यांना 25 जुलैपर्यंत पोलिस कोठडी

पुणे, पुढारी वृत्तसेवा: राजस्थानच्या जयपूर शहरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या तयारीत असलेल्या आणि सुफा या आतंकवादी टोळीशी संबंधित असलेल्या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता 25 जुलै पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

राजस्थानमधील एनआएच्या एका गुन्ह्यात हे आरोपी फरार होते. त्यांच्यावर पाच लाखाचे बक्षीस देखल ठेवण्यात आले होते. इम्रान खान आणि मो. युनूस साकी अशी दोघांची नावे आहेत. मंगळवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास कोथरूड पोलिस पेट्रोलिंग पथकातील प्रदीप चव्हाण आणि अमोल नाझन यांनी तीन संशयित दुचाकी चोरांना पकडले. जेव्हा त्यांना घराच्या झडतीसाठी नेले, तेव्हा त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी दोघांना पकडले. त्यानंतरच्या घराच्या झडतीत एक जिवंत राऊंड आणि 4 मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला. गेल्या दीडवर्ष्यापासून ते पुण्यात वास्तव्याला असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा:

पुणे : थिटेवाडी धरण कोरडे पडले

पुणे : नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीने प्रवासी हैराण

पुणे : कोणीही या अन् फुटपाथवर दुकाने थाटा ; रस्ते विकास महामंडळ प्रशासन सुस्त

 

Back to top button