सातारा जिल्हा बँक : जरंडेश्वर कारखान्याचा कर्ज पुरवठा सुरक्षित | पुढारी

सातारा जिल्हा बँक : जरंडेश्वर कारखान्याचा कर्ज पुरवठा सुरक्षित

सातारा : पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्हा बँक अडचणीत जरी आली असली तरी कर्जपुरवठा सुरळीत राहणार आहे. तसेच सातारा जिल्हा बँक कडे ईडीने जरंडेश्वर शुगर मिल्स या कारखान्याच्या कर्ज प्रक्रियेची माहिती मागितली आहे.

या कारखान्याला दिलेल्या कर्जाची माहिती दिली आहे. कारखान्याला कायदेशीर बाबी व शासकीय धोरणानुसारच कर्जपुरवठा करण्यात आलेला आहे.

अधिक वाचा : 

ED raids multiple premises in money laundering case against GKV group, MIAL- The New Indian Express

तसेच हा कर्जपुरवठा सुरक्षित असून ठेवीदार यांनी घाबरण्याची गरज नाही, अशी माहिती सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.

अधिक वाचा : 

 

 

Shivendra Raje Bhosale Wiki, Biography, Age, Family, Images & More - wikimylinksआ. शिवेंद्रराजे म्हणाले, शासकीय धोरणानुसारच कारखान्याला कर्जपुरवठा करण्यात आलेला आहे. सध्याच्या घडीला जिल्हा बँकेकडून पहिल्या टप्प्यात जरंडेश्वर कारखान्याला 129 कोटींचे कर्ज मंजूर झालेले आहे.

अधिक वाचा : 

त्यापैकी तीस कोटींचे कर्ज कारखान्याने घेतले असून त्यातील 15 कोटी फेडलेही आहेत. हे कर्ज देताना जिल्हा बँकेने कारखान्याची 482 कोटींची मालमत्ता तारण म्हणून ठेवलेली आहे.

उभारणी ते लिलाव... असा आहे जरंडेश्वर साखर कारखान्याचा खडतर प्रवास - Marathi News | From erection to auction ... This is the arduous journey of Jarandeshwar Sugar Factory | Latest maharashtra News at ...

100 कोटींची साखरही तारण म्हणून ठेवण्यात आली आहे. कारखान्याला दिलेल्या कर्जाची सर्व प्रक्रिया संचालक मंडळाच्या ठरावानुसार केलेली असून यामध्ये काहीही गैरकारभार झाला नसल्याचे आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.

हे ही वाचा 

Back to top button