लसीकरण : अजूनही बराच पल्ला बाकी! राज्यातील २३.७४ टक्के लसीकरण पूर्ण | पुढारी

लसीकरण : अजूनही बराच पल्ला बाकी! राज्यातील २३.७४ टक्के लसीकरण पूर्ण

कोल्हापूर; सुनील कदम : देशात लसीकरण बाबतीत महाराष्ट्राने आघाडी घेतली असली तरी अजून बराच पल्ला गाठणे बाकी आहे. कारण आजपर्यंत राज्यातील केवळ 23.74 टक्केच लोकांचे लसीकरण पूर्ण झाले असून, अजून 76 टक्क्यांवर लोकांचे लसीकरण होणे बाकी आहे. राज्यात लसीकरणाच्या बाबतीत मुंबई-पुण्याने आघाडी घेतली असून, अन्य बहुतांश जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचा वेग सरासरीपेक्षा कमी असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसते.

आजघडीला देशाची लोकसंख्या 139 कोटी 77 लाख 53 हजार 851 इतकी आहे. यापैकी 30 कोटी 45 लाख 91 हजार 540 लोकांचे म्हणजे सरासरी 21.79 टक्के लोकांचे दुहेरी लसीकरण पूर्ण झाले आहे. महाराष्ट्रातील लसीकरणाची सरासरी मात्र 23.74 टक्के इतकी असून, देशाच्या सरासरीपेक्षा किंवा अन्य राज्यांच्या सरासरीपेक्षा ती जादा आहे. सध्या राज्याची लोकसंख्या 12 कोटी 49 लाख 4 हजार 71 इतकी आहे. यापैकी 2 कोटी 96 लाख 57 हजार 699 लोकांचे दुहेरी लसीकरण पूर्ण झालेले आहे.

लसीकरणाच्या बाबतीत पुणे आणि मुंबईने मोठी आघाडी घेतल्याचे दिसत असून, तिथे अनुक्रमे 39.31 आणि 38.62 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरणात राज्याच्या सरासरीपेक्षा पुढे असणारे जिल्हे पुढीलप्रमाणे : गडचिरोली 30.39, भंडारा 30.36, सिंधुदुर्ग 28.99, नागपूर 26.76, सांगली 24.98 आणि सातारा 24.97. अन्य सर्व जिल्ह्यांमधील लसीकरणाचा वेग सरासरीपेक्षा कमी असल्याचे दिसते. सोलापूर जिल्ह्याचा लसीकरणाचा वेग राज्यात सर्वात कमी म्हणजे केवळ 13.65 टक्के इतका आहे. अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, परभणी, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये लसीकणाची गती अत्यंत कमी असल्याचे दिसत आहे.

लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्यसेवक-सेविका, पोलिस, प्रशासकीय कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर आणि ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात आले होते. त्यामुळे बहुतांश जिल्ह्यांत या वर्गातील लोकांचे लसीकरण बर्‍यापैकी पूर्ण झाल्याचे दिसत आहे.

लसीकरणाची जिल्हानिहाय आकडेवारी

जिल्हा            लोकसंख्या           लसीकरण         पूर्ण टक्केवारी

औरंगाबाद     41,13,975           6,88,913          16.74
जळगाव        47,01,553           6,77,824          14.41
जालना          21,77,480           3,78,099          17.36
कोल्हापूर      43,08,175           10,20,011         23.67
मुंबई           1,38,29,697          53,41,361        38.62
नागपूर          51,72,443           13,84,539        26.76
नाशिक          67,88,138          12,40,830         18.27
रत्नागिरी        17,95,149           3,80,745           21.20
सांगली           31,36,812          7,83,684           24.98
सातारा           33,38,658           8,33,932          24.97
सिंधुदुर्ग           9,44,387            2,73,856          28.99
सोलापूर         47,99,186            6,55,471         13.65

Back to top button