देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ कर्जतमध्ये; १ ऑगस्ट पासून पहिले शैक्षणिक वर्ष होणार सुरू

देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ कर्जतमध्ये; १ ऑगस्ट पासून पहिले शैक्षणिक वर्ष होणार सुरू
Published on
Updated on

पनवेल : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण खात्याने, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) प्रेरित शिक्षण देणाऱ्या भारतातील व राज्यातील पहिल्या विद्यापीठाला अंतिम मंजुरी दिली आहे. या विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत.

कर्जत येथे युनिव्हर्सल एआय विद्यापीठ कार्यान्वित झाल्याची माहिती खात्यातर्फे जारी अधिसूचनेद्वारे देण्यात आली आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (एआय) क्षेत्रातील पदवी व पदव्युत्तर स्पेशलाइझ्ड अभ्यासक्रम देऊ करणारे युनिव्हर्सल एआय हे भारतातील पहिले विद्यापीठ आहे. महाराष्ट्र सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण खात्याने या विद्यापीठाला मंजुरी दिली होती व तसे पत्र २५ जानेवारी २०२३ रोजी पाठवले होते. आता विद्यापीठ कार्यान्वित करण्यासाठीही सरकारने मंजुरी दिली आहे. युनिव्हर्सल एआय विद्यापीठाचे पहिले शैक्षणिक वर्ष १ ऑगस्ट २०२३ पासून सुरू होणार आहे.

एआय प्रेरित शिक्षणाला समर्पित पहिले विद्यापीठ म्हणून नवीन युनिव्हर्सल एआय विद्यापीठ, आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या क्षेत्रातील खास विकसित करण्यात आलेले अभ्यासक्रम देऊ करेल. विद्यापीठाने एआय व फ्युचर टेक्नोलॉजीजमधील (भविष्यकालीन तंत्रज्ञानातील) विशेष पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम विकसित केले आहेत. तसेच लिबरल आर्ट्स व ह्युमॅनिटीज, ग्लोबल अफेअर्स व डिप्लोमसी, कायदा, पर्यावरण व शाश्वतता आणि क्रीडाविज्ञान आदी विषयांवरील आधुनिक अभ्यासक्रमही तयार केले आहेत.

विद्यापीठाने महाराष्ट्रातील कर्जत येथे ग्रीन कॅम्पस तयार केला आहे. युनिव्हर्सल एआय विद्यापीठाचे कुलपती व संस्थापक प्राध्यापक तरुणदीप सिंग आनंद घोषणेच्या वेळी म्हणाले, २१ व्या शतकातील सार्वत्रिक कौशल्यांचे शिक्षण देणारे भारतातील व महाराष्ट्रातील पहिले समर्पित एआय विद्यापीठ देशाच्या व राज्याच्या वाढ आणि विकासातील एक महत्त्वपूर्ण प्रेरक घटक ठरणार आहे. शिवाय, हे विद्यापीठ नवीन एआय तंत्रज्ञानांच्या विकासासाठी संशोधन केंद्राची भूमिकाही बजावेल. त्यातून भारताला आर्थिक व तंत्रज्ञानात्मक लाभ होतील. जग अधिकाधिक स्वयंचलनाकडे व डिजिटल रूपांतरणाकडे जात असताना, जागतिक अर्थव्यवस्थेत, देशाला स्पर्धात्मक स्थितीमध्ये राहण्यासाठी, एआय शिक्षण व संशोधन हे खूपच महत्त्वाचे आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news