drug case : आर्यन खानच्‍या जामीन अर्जावर आज सुनावणी - पुढारी

drug case : आर्यन खानच्‍या जामीन अर्जावर आज सुनावणी

मुंबई : पुढारी ऑनलाईन

मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणात ( drug case : ) बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्‍या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्‍यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्‍यान, आर्यन खानच्‍या फोनमधील मेसेज एनसीबी आज न्‍यायालयात सादर करणार आहे. या मेसेजमध्‍ये त्‍याचे ड्रग्‍ज विक्रेत्‍यांबरोबर संवाद असल्‍याचा दावा एनसीबीने केला आहे.

२ ऑक्‍टोबर रोजी मुंबईतील एक क्रुझवरील रेव्‍ह पार्टींवर (drug case : ) एनसीबीने छापा टाकला होता. यावेळी आर्यन खान, अरबाज मर्चेंटसह सहा जणांना ताब्‍यात घेण्‍यात आले होते. यानंतर याप्रकरणी आर्यन खानसह आठ जणांना अटक करण्‍यात आली. यामध्‍ये दोन युवतींचाही समावेश आहे. न्‍यायालयांनी सर्व संशयित आरोपींना न्‍यायालयीन कोठडी सुनावल्‍यानंतर सर्वांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्‍यात आली होती.

१४ ऑक्‍टोबर रोजी जामीन अर्जावरील सुनावणीवेळी न्‍यायालयाने २० ऑक्‍टोबरपर्यंत यावरील निर्णय राखीव ठेवला आहे. त्‍यामुळे आर्यन खानचा आर्थर रोड कारागृहातील मुक्‍काम वाढला होता.

हेही वाचलं का ? 

 

 

 

 

Back to top button