Shah Rukh Khan समोरच समीर वानखेडेंनी आर्यन खानच्या कानाखाली दोनवेळा जाळ काढला? - पुढारी

Shah Rukh Khan समोरच समीर वानखेडेंनी आर्यन खानच्या कानाखाली दोनवेळा जाळ काढला?

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलिवूड चित्रपट अभिनेता शाहरुख खानचा Shah Rukh Khan मुलगा आर्यन खानच्या अडचणी संपण्याचे नाव घेत नाही आहे. एनडीपीसी कोर्टाने आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना आपला निर्णय 20 ऑक्टोबरपर्यंत राखून ठेवला आहे. ज्यामुळे सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला आणखी 6 दिवस तुरुंगात काढावे लागतील. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावर कोर्टाने सलग 2 दिवस सुनावणी केली. त्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल बातमीमध्ये दावा केला जात आहे की आर्यन खानला जेलच्या आत NCB अधिकारी समीर वानखेडे यांनी दोनदा थप्पड मारली होती. तेही जेव्हा तो वडील शाहरुख खानसोबत फोनवर बोलत होता.

व्हायरल रिपोर्टनुसार, असा दावा केला जात आहे की शाहरुख खानला Shah Rukh Khan ठणकावून सांगण्यासाठी समीर वानखेडे यांनी हे पाऊल उचलले आणि त्यांनी सुपरस्टारला निर्देश दिले की त्यांनी हे आधीच करायला पाहिजे होतं. ज्यामुळे त्याचा मुलगा आर्यनला ड्रग्जचे व्यसनी गेला नसता. आपण हे व्हायरल सोशल मीडिया पोस्ट येथे पाहू शकता.

तर हे खरोखर घडले का? ही बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये लिहिले आहे की, ‘NCB अधिकारी समीर वानखेडे बॉलिवूडचा खरा सिंघम आहे’. काही हिंदी संकेतस्थळांनीही ही बातमी प्रसिद्ध केली आहे. पण या बातम्या खोट्या आहेत. यापैकी काहीही खरे नाही. व्हायरल पोस्ट फेक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button