औरंगाबाद : भीषण अपघातात बहिण, भाऊ, भाचीचा मृत्यू | पुढारी

औरंगाबाद : भीषण अपघातात बहिण, भाऊ, भाचीचा मृत्यू

पिशोर (औरंगाबाद) : पुढारी वृत्तसेवा

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील पिशोर सिल्लोड रस्त्यावर ट्रॅक्टर व दुचाकीच्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार तर एकाचा उपचारासाठी नेत असताना मुतृ झाला. ही घटना काल (दि.१५) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. मयत बाली भीमा चौगुले (वय २५) ज्योती भीमा चौगुले (वय ३) (दोघी रा.चिंचोली लिंबाजी) असे अपघातात मृत झालेल्या माय लेकीची नावे आहेत. तर उपचारास नेत असताना सोमनाथ शेषरावर सुरे यांचा मृत्यू झाला.

याविषयी अधिक माहिती अशी की, पिशोर येथील सोमनाथ शेषराव सुरे हा दसऱ्यासाठी त्याची बहिण बाली चौगुले हिला चिंचोली लिंबाजी येथे आणायला गेला होता. सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान पिशोर सिल्लोड रस्त्यावरील मोन्हंद्री फाट्यावर ट्रॅक्टर व दुचाकीचा अपघात झाला.

औरंगाबाद : एकाच गाडीवर पाचजण जात असताना तिघांचा मृत्यू

दुचाकीवर भाऊ, बहीण, तीन लहान बालकांसह पाच जण जात होते. दरम्यान सोमनाथ सुरेच्या घरापासून अवघ्या काही अंतरावरच हा अपघात झाला.

घटनास्थळाजवळ असलेल्या नागरिकांनी तात्काळ गंभीर जखमी सोमनाथसह सर्वांना पिशोर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉ कोकणे यांनी बाली व ज्योती चौगुले या माय लेकी मृत झाल्याचे सांगितले.

उपचारासाठी घेऊन जात असतानाच मृत्यू

गंभीर जखमी सोमनाथ व लहान बाळ कांती चौगुले, रेणुका चौगुले यांना तात्काळ पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात पाठविले यावेळी वाटेतच सोमनाथता मृत्यू झाला.

हा अपघात ज्या ट्रक्टरमुळे झाला त्याचा शोध अद्यापही लागला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

या घटनेचा पुढील तपास सपोनी हरिशकुमार बोराडे, विजय आहेर करीत आहेत.

Back to top button