

"महाराष्ट्रात अत्याचार होताहेत, तू गप्प कसे बसत आहात. काय चाललंय महाराष्टात? बलात्कार करणाऱ्याला हत्तीच्या पायी द्या. राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. ऊस तोड कामागारांचं काम माझ्या मनासारखं झालं नाही. मराठा आणि ओबीसी समाजात भांडणे लावण्याच प्रयत्न केला जात आहे. पण, हे दोघेही बहुजन आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेला शोभतील, असे निर्णय घेतील त्याकडे माझेही लक्ष लागून राहिलेले आहे", असे मत भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मांडले.
दसऱ्यानिमित्त सावरगाव येथील भगवानगडावर आयोजित केलेल्या मेळाव्यात पंकजा मुंडे बोलत होत्या. "ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही. कोणत्या नेत्याची चमचेगिरी करण्यासाठी फुले टाकत नव्हते, तर भगवान बाबांच्या आणि तुमच्या चरणी फुले टाकत होते. तुमच्या या प्रेमासमोर माझी झोळी कमी पडायला लागली आहे. असा रांगडा सोहळा देशात कधी झाला नसेल", असंही पंकजा मुंडे म्हंटलं आहेय
मुंढे नसते तर जानकर मेंढरं राखत बसला असता
"आम्ही गद्दार, लाचार होणार नाही. सत्तेपाठी आम्ही भीक मागत नाही. नेते पद रक्तात असावं लागतं, नेता विकत घेता येत नाही. मी पठ्ठ्या पंकजाताईंचा भाऊ आहे ना महादेव जानकर. मी मेलो तरी ताई तुला सोडणार नाही. मुंढे नसते तर जानकर मेंढरं राखत बसला असता. मी पुन्हा तिकीट मागायला जाणार नाही. ताई तू काळजी करून नको. माझा पक्ष उत्तरप्रदेशात चांगलं काम करत आहे, तिथूनही तू खासदार होशील.ओबीसींची अवस्थेला जबाबदार कोण?", असं मत महादेव जानकर यांनी व्यक्त केले.
मेळाव्यातून संघर्ष करण्याची प्रेरणा मिळते
दसऱ्यानिमित्त सावरगाव येथील भगवानगडावर आयोजित केलेल्या मेळाव्यात जानकर बोलत होत्या. या मेळाव्यात खासदार प्रितम मुंडे म्हणाल्या. "आपला मेळावा हा कोणत्या पक्षाचा नाही. मनात शंका असलेल्यांनी हा जनसमुदान पाहावा. आपला आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवा. मुंडे परिवारासाठी हा मेळावा खूप महत्वाचा आहे. हे व्यासपीठ आघाडीचं नाही, प्रत्येक वंचितासाठीचं व्यासपीठ आहे. उशीर झाला तरीही गर्दी तेवढीच आहे. अशा मेळाव्यातून संघर्ष करण्याची प्रेरणा मिळते", असे मत खासदार प्रितम मुंडे यांनी व्यक्त केले.
पहा व्हिडीओ : ओबीसी राजकारणाचा गुरुमंत्र देणारा भगवानगड. दसरा मेळावा…