उद्धव ठाकरे : ‘उपटसुंभे नवहिंदू उगवलेत त्यांच्यापासूनच अधिक धोका आहे’ | पुढारी

उद्धव ठाकरे : 'उपटसुंभे नवहिंदू उगवलेत त्यांच्यापासूनच अधिक धोका आहे'

मुंबई; पुढारी ऑनलाईन

शिवसेनेसाठी देदीप्यमान परंपरा असलेला दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृहात होत आहे. कोरोना नियमावलीचे पालन करून हा मेळावा होत आहे. त्यामुळे या मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते. त्यांनी भाषणाची सुरुवातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवून केली. मी मुख्यमंत्री आहे असे कधीच वाटता कामा नये, असे सांगत फडणवीसांना टोला लगावला.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जमलेल्या माझ्या हिंद बांधवानो असे संबोधत आपल्या भाषणाला सुरुवात केली.
  • बऱ्याच दिवसांनी आपल्याला वाव मिळाला आहे
  • आपला आवाज कुणी दाबू शकत नाही, आणि दाबणारा जन्माला देखील आलेला नाही.
  • १९६६ पासूनची परंपरा पुढे नेत आहोत याचा अभिमान आहे.
  • जिवंत शिवसैनिक हीच खरी शस्त्रे
  • मी मुख्यमंत्री आहे असे कधीच वाटता कामा नये
  • माझं भाषण संपतय कधी आणि कधी चिरकतोय याची वाट पाहत असतात
  • चिरकणे हे त्यांच्यासाठी रोजगार हमी प्रमाणे झालं आहे : उद्धव ठाकरे
  • धमक असेल, तर अंगावर या, ईडी सीबीआयची मदत घेऊ नका
  • पदाची जबाबदारी विचाराने घेतली आहे.
  • जबाबदारी पार पाडल्याशिवाय थांबणार नाही
  • मी फकीर नाही, झोळी घेऊन जाईन असे म्हणणार नाही
  • सत्तेचे व्यसन हा सुद्धा अंमली प्रकारच

Back to top button