३२१ वर्षांची प्राचीन सरखेल कान्हाेजीराजे आंग्रे घराण्याची शाही शस्त्रपूजा | पुढारी

३२१ वर्षांची प्राचीन सरखेल कान्हाेजीराजे आंग्रे घराण्याची शाही शस्त्रपूजा

अलिबाग ः जयंत धुळप

मराठा साम्राज्याच्या स्थापनेत शस्त्रांचे म्हत्व अनन्य साधारण हाेते. या शस्त्रांच्या माध्यमातून परकियांबराेबरच्या लढाया यशस्वी हाेऊन, स्वकीय रयतेला सुखाचे आणि आनंदाचे राज्य प्राप्त हाेऊ शकले. त्यामुळे विजया दशमीच्या दिवशी शस्त्रपूजा करुन त्या शस्त्रांच्या प्रती पवित्र आदरभाव व्यक्त करण्याच्या हेतूने सरखेल कान्हाेजी राजे आंग्रे यांनी इ.स.१७०० मध्ये प्रारंभ केलेल्या विजया दशमीच्या दिवशीच्या शस्त्र पूजेची परंपरा गेली ३२१ वर्ष आंग्रे घराण्यात आजही अबाधित असल्याची माहिती सरखेल कान्हाेजी राजे आंग्रे यांच्या नवव्या पिढीचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी खास दैनिक पुढारीशी बाेलताना दिली आहे.

शुक्रवारी विजयदशमीच्या दिवशी रघुजीराजे आंग्रे यांच्या येथील हिराकाेट किल्ल्या शेजारील घेरीया या निवासस्थानी सरखेल कानाेजी राजे आंग्रे यांच्यापासूनच्या प्रत्यक्ष वापरातील आठ पिढ्यांच्या शस्त्रांची प्राचिन परंपरेनुसार विधीवत पूजा करण्यात आली. त्या निमित्ताने रघूजीराजे आंग्रे बाेलत हाेते. शस्त्रांची माहिती देताना रघूजी राजे आग्रे पूढे म्हणाले की, शस्त्र चालवायला मनगटात शक्ती येण्याची गजर असते, आणि त्याकरिता मनात ताकद आणि मनावरचे नियंत्रण अत्यंत महत्वाचे असते.

आठ पिढ्याची एकुण सुमारे ६० विविध प्रकारची शस्त्रे

सरखेल कान्हाेजी राजे आंग्रे यांच्या आठ पिढ्याची एकुण सुमारे ६० विविध प्रकारची शस्त्रे रघुजीराजे आंग्रे यांनी अत्यंत काळजीपूर्वक जतन करुन ठेवीली आहेत. या मध्ये सर्वात महत्वाचे शस्त्र म्हणजे सरखेल कान्हाेजीराजे आंगॅे यांनी स्वतः प्रत्यक्ष युद्धात वापरलेली “ताेग ” ही तलवार आहे. दमास्कर स्टील पासून बनवलेली ही तलवार तब्बल ५ किलाे ३०० ग्रॅम वजनाची असून, तीची लांबी ४० इंच आणि रुंदी ३ इंच आहे.

या शिवाय सरखेलांची सेरेमाेनीयल तलवार ही देखील वैशिष्छपूर्ण तलावार असून या तलवारीची मुठ साेन्याची असून पाते पाेलादी आहे. सेरेमाेनीयल तलवार लढाईत वापरण्यात येत नाही. ती दरबारात वा शाही कार्यक्रमात सरखेल कान्हाेजीराजे आंग्रे वापरत असत अशी माहिती रघुजीराजे आंग्रे यांनी दिली.

या महत्वपूर्ण तलवारीं व्यतिरिक्त “गुर्द्र” ही वेशिष्ठ्यपूर्ण तलवार या मध्ये आहे. या तलवारीच्या पात्याला धार नसते मात्र तीच्या टाेकाला पाेलादी डाेके असते. शत्रूवर या तलवारीचा प्रहार झाला तर शत्रू १०० टक्के जायबंदी हाेणारच असे कर्तृत्व या तलवारीचे हाेते. अन्य तलवारींमध्ये फिरंग आणि कर्नाटकी थाेप या तलवारी महत्वाच्या आहेत.या बराेबर आरमारी व नियमित असे दाेन प्रकारचे भाले, विविध लांबीच्या गुप्त्या, परशू आणि कुऱ्हाडी, दांडपट्टा, मराठा तलवारी, कट्यारी, जांबीया आणि बंदूकांचा समावेश आहे.

हे ही वाचलं का?

 

Back to top button