नाशिक : शताब्दी वसंत व्याख्यानमालेस सुरुवात; आज भक्ती संध्या | पुढारी

नाशिक : शताब्दी वसंत व्याख्यानमालेस सुरुवात; आज भक्ती संध्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वसंत व्याख्यानमालेच्या शताब्दी वर्षानिमित्त गेल्या कित्येक दिवसांपासून तयारी सुरू होती. त्याची सुरुवात सोमवारी (दि. 1) होत असून, दि. 1 ते 31 मे दरम्यान दररोज सायंकाळी 7 ला गोदाघाटावरील यशवंतराव महाराज पटांगणावर देशभरातील व्याख्यात्यांची वैचारिक मेजवानी नाशिककरांना ऐकायला मिळणार आहे.

या कार्यक्रमांमध्ये (दि. 1) विक्रम हाजरा, आंतरराष्ट्रीय गायक, संगीतकार (भक्ती संध्या), (दि. 2) डॉ. गणेश चंदनशिवे, डॉ. प्रकाश खांडगे (रंग शाहिरीचे), (दि. 3) प्रवीण मानकर, जगप्रसिद्ध बॅगपॅकर (बॅग पॅकिंगचं भूत पाठीवर घेऊन जगभर फिरा), (दि.4) देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री (व्याख्यान होण्याची शक्यता), (दि.5) प्रा. रोहिदास आरोटे, साउथ कोरिया (विज्ञानाशी जडले नाते), (दि. 6) प्रसाद सेवेकरी, पुणे (आपत्ती व्यवस्थापन, मानवतावाद आणि आपण), (दि. 7) डॉ. रमण गंगाखेडकर, नवी दिल्ली (भारताचा कोविड विरुद्धचा लढा), (दि. 8) ब्रह्माकुमारी संतोष दीदी, माउंट अबू (आध्यात्मिक ज्ञानद्वारा जीवनमें सुख शांती की प्राप्ती), (दि. 9) इश्तियाक अहमद, ज्येष्ठ लेखक, पत्रकार, विचारवंत, स्वीडन (जत्रेत हरविलेल्या दोन भावांची कथा भारत-पाकिस्तान आणि त्यांचे वेगवेगळे सामाजिक राजकीय मार्ग आणि त्यांनी एकमेकांशी कसे वागावे, एक सूचना), (दि. 10) सी. डी. मायी, कृषी तज्ज्ञ, नागपूर (भविष्यातील भारतीय शेती), (दि.11) श्रीया जोशी, दुबई (प्रवास एका अन्नपूर्णेचा), (दि. 12) शेखर गायकवाड, साखर आयुक्त, पुणे (प्रशासनाकडून जनतेच्या अपेक्षा), (दि. 13) डॉ. गौरी कानेटकर, अनुरूप विवाह संस्था, पुणे (विवाह संस्थेचे बदलते स्वरूप), (दि. 14) शिवरत्न शेटे, सोलापूर (शिवशंभू : पिता – पुत्रांचे अविस्मरणीय भावबंध), (दि.15) दामोदर मावजो, गोवा (श्रेयस की प्रेयस), (दि. 16) माधवी आमडेकर, लंडन, ब्रिटन (विद्यमान शैक्षणिक व्यवस्था आणि भवितव्य), (दि.17) महेश भागवत, अतिरिक्त पोलिस महासंचालक, तेलंगणा (स्पर्धा परीक्षा आणि महाराष्ट्रातील युवक), (दि.18) अ‍ॅड. नितीश जोशी, अमेरिका (अमेरिकेतील मराठी समाज काल, आज, उद्या), (दि. 19) डॉ. रवि गोडसे, अमेरिका (वैद्यकशास्त्रातील विनोद), (दि. 20) कॅप्टन नीलम इंगळे, एअर इंडिया पायलट, मुंबई (नभांगण).

चेतन भगत यांच्या व्याख्यानाचे आकर्षण
(दि. 21) केवल अमित, फ्रान्स (वाइन ट नाइन भारतीय उद्योगाला आकार देणारे नऊ बदल), (दि. 22) चेतन भगत, लेखक, दिल्ली (जीवनातील ध्येय गाठण्यासाठी युवकांपुढील आव्हाने), (दि. 23) डॉ. चंद्रशेखर चव्हाण, अमेरिका (नेत्र आणि दृष्टी), (दि.24) भरत गिते, जर्मनी (मेक इन इंडिया पायाभूत सुविधा क्षेत्र), (दि. 25) देवेंद्र गावंडे, ज्येष्ठ पत्रकार, नागपूर (महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील नागरिक शेजारच्या राज्यांच्या प्रेमात का?), (दि. 26) ज्ञानेश्वर मुळे, माजी परराष्ट्र सचिव, दिल्ली (देश-विदेशातील अद्भूत अनुभव), (दि. 27) राजदीप सरदेसाई, ज्येष्ठ पत्रकार, दिल्ली (भारतातील राजकीय सद्यस्थिती), (दि. 28) प्रा. धनश्री लेले, ठाणे (महाकवी सावरकर), (दि. 29) विद्या जोशी, अमेरिका (भारताबाहेरील भारत), (दि. 30) झी मराठी प्रस्तुत उत्सव नात्यांचा (सेलिब्रिटी कलाकारांसोबत संवाद सारेगमप गायकांची धमाल), (दि. 31) महाराष्ट्राची हास्यजत्रा (कार्यक्रमाचे सादरीकरण) हे कार्यक्रम रंगणार आहेत.

हेही वाचा:

Back to top button