आपला दवाखाना याेजना राज्यातील ३१७ तालुक्यांच्या ठिकाणी सुरू : मुख्यमंत्री

आपला दवाखाना याेजना राज्यातील ३१७ तालुक्यांच्या ठिकाणी सुरू : मुख्यमंत्री
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यातील ३१७ तालुक्यांच्या ठिकाणी 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' योजना आजपासून सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या योजनेचा दूरदृश्य प्रणालीच्‍या माध्‍यमातून याचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमास दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर त्या-त्या जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणांहून लोकप्रतिनिधींसमवेत सहभागी झाले होते. याबाबतची मा.िहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटच्‍या माध्‍यमातून दिली आहे. (Aapla Dawakhana)

आपला दवाखाना योजनेतून ३० विविध चाचण्या मोफत

एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'आपल्याला कोरोनाने आरोग्य व्यवस्थेच्या सक्षमीकरणाचा धडा दिला आहे. छोट्या छोट्या आजारांवरील उपचारासाठी मोठ्या रुग्णांलयांचा ताण कमी करावा लागेल. या उद्देशाने आणि गरजूंना घराजवळ उपचाराची सुविधा मिळवून देण्याची गरज लक्षात घेऊन आपण ठाणे येथून या योजनेची सुरवात केली होती. त्याची अंमलबजावणी मुंबईमध्ये सुरू केली. आता संपूर्ण राज्यात आपला दवाखाना सुरू होत आहे. या योजनेतून ३० विविध चाचण्या मोफत करण्यात येणार आहेत. 'सामान्य माणसांचा विचार करून लोकाभिमुख, लोकोपयोगी निर्णय घेण्यात सरकार प्रय़त्नशील असून, त्यामध्ये आपला दवाखाना ही संकल्पना महत्वपूर्ण ठरेल, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news