

पुढे बोलत असताना फडणवीस म्हणाले, नऊ महिन्यापूर्वी राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक नवं सरकार स्थापन झालं आहे. या नऊ महिन्यात आपण महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या जीवनात परिवर्तन आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या सरकारचा पहिला अर्थसंकल्प ज्यामध्ये आम्ही विविध घोषणा घोषित केल्या त्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांसाठी त्यांच्यावर नैसर्गिक संकटांमुळे जी परिस्थिती ओढावते त्यासाठी विविध योजना आणल्या. शिंदे सरकार आल्यापासून राज्यातील शेतीसाठी आपण अनेक निर्णय घेतले गेले. शेतीच्या प्रगतीसाठी अथक प्रयत्न केले. राज्यातील शेती शाश्वत झाली पाहिजे. पण अवकाळी पाऊस हे सर्वात मोठं नैसर्गिक आव्हान आहे.
त्याचबरोबर ३०० हून अधिक 'आपला दवाखाना'चं उद्धाटन केलं आहे. जनतेचं आरोग्य ही सरकारची प्राथिमकता आहे. याशिवाय महिलांसाठी विविध योजनांची घोषणा केली. महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक येत आहे ती देशात येणाऱ्या एकूण गुंतवणुकीपैकी 30 टक्के आहे. मला विश्वास आहे की तळागाळातील सर्वांना एकत्र घेऊन हे सरकार आपलं राज्य प्रगतीवर नेण्याचा प्रयत्न करेल, असेही ते म्हणाले.