Karnataka election BJP manifesto | दररोज अर्धा लिटर नंदिनी दूध, ३ मोफत सिलिंडर ते समान नागरी कायदा, भाजपचा कर्नाटकसाठी जाहीरनामा

Karnataka election BJP manifesto | दररोज अर्धा लिटर नंदिनी दूध, ३ मोफत सिलिंडर ते समान नागरी कायदा, भाजपचा कर्नाटकसाठी जाहीरनामा
Published on
Updated on

बंगळूर; पुढारी ऑनलाईन : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी बंगळूरमध्ये कर्नाटक निवडणुकीसाठी पक्षाचे व्हिजन डॉक्युमेंट म्हणजेच जाहिरनामा प्रसिद्ध केला. हा जाहीरनामा प्रजा ध्वनी या नावाने आहे. भाजपने जाहीरनाम्यात सर्व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना (BPL families) वर्षाला ३ मोफत गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले आहे. हे मोफत गॅस सिलिंडर उगादी, गणेश चतुर्थी आणि दीपावली सणानिमित्त दिले जातील. तसेच 'पोषण' योजना सुरू केली जाईल. याद्वारे प्रत्येक दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाला दररोज अर्धा लिटर नंदिनी दूध आणि मासिक रेशन किटद्वारे ५ किलो श्री अण्णा- सिरी धान्य दिले जाणार असल्याचे जाहीरनाम्यात नमूद केले आहे. कर्नाटकात समान नागरी कायद्याच्या (Uniform Civil Code) अंमलबजावणीसाठी एका उच्चस्तरीय स्थापन केली जाणार असल्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. (Karnataka election BJP manifesto) यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुराप्पा उपस्थित होते.

भाजपच्या जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे (Karnataka election BJP manifesto)

  • राज्यभर स्वस्त, दर्जेदार आणि सकस आहार पुरविण्यासाठी आम्ही राज्यातील प्रत्येक महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागात एक 'अटल आहार केंद्र' (Atal Aahara Kendra) उभारू.
  • आम्ही 'पोषण' योजना सुरू करणार आहोत ज्याद्वारे प्रत्येक दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाला दररोज अर्धा लिटर नंदिनी दूध आणि महिन्याच्या रेशन किटद्वारे ५ किलो श्री अण्णा – सीरी धान्य दिले जाईल.
  • आम्ही सर्व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाला वार्षिक ३ मोफत गॅस सिलिंडर देऊ; उगादी, गणेश चतुर्थी आणि दीपावली या सणाना प्रत्येकी एक या प्रमाणे मोफत सिलिंडर मिळेल.
  • आम्ही विश्वेश्वरय्या विद्या योजना सुरू करणार आहोत. या योजने अंतर्गत राज्य सरकार सरकारी शाळांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आणि उच्च दर्जासाठी तज्ज्ञ व्यक्ती आणि संस्थांचे सहकार्य घेतले जाईल.
  • आम्ही विद्यार्थ्यांना IAS/KAS/बँकिंग/सरकारी नोकऱ्यांसाठी प्रशिक्षण घेण्यासाठी आर्थिक सवलत देऊ. जेणेकरुन महत्त्वाकांक्षी तरुणांना करिअरसाठी पाठबळ मिळेल.
  • आम्ही राज्यात समान नागरी कायदा लागू करु. त्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईल. या समितीच्या शिफारशींवर आधारित समान नागरी कायदा लागू केला जाईल. (karnataka election bjp)

जाहीरनाम्यात सर्व मुद्यांचा समावेश केला आहे. तो अतिशय चांगला जाहीरनामा आहे. त्याच्या आधारावर आम्ही राज्यातील निवडणुकीत सुमारे १३५ ते १४० जागा जिंकू.
– बीएस येडियुरप्पा, माजी मुख्यमंत्री, कर्नाटक

२०१८ मधील विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात गोरक्षणाच्या उपाययोजनांचा समावेश केला होता. आता दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना जाहीरनाम्यातून प्रामुख्याने मोठी आश्वासने दिली आहेत. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि जेडीएस अशी तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. गेल्या विधानसभा निवडणुका जेडीएससोबत युती करून लढलेल्या काँग्रेसने यावेळी स्वबळावर एकट्याने लढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे चुरस पाहायला मिळणार आहे. (karnataka bjp rule)

 हे ही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news