NIA Raid : ‘पीएफआय’ संघटनेविरोधात ‘एनआयए’ची फोंड्यात छापेमारी | पुढारी

NIA Raid : 'पीएफआय' संघटनेविरोधात 'एनआयए'ची फोंड्यात छापेमारी

पुढारी ऑनलाईन डेस्क :  देशविघातक कारवायांमध्ये गुंतलेल्या आणि बंदी घालण्यात आलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (Popular Front of India- PFI) या संघटनेविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) देशभरात छापे टाकले आहेत. एजन्सीने आज (दि.२५) सकाळी गोव्यासह उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब या राज्यांचा समावेश आहे. या संघटनेच्या बंदी घातलेल्या कार्यकर्त्यांविरोधात कारवाई करण्यात येत आहे. एनआयएनची आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई म्हणून या तपासाकडे पाहिले जात आहे. गोव्यातील फोंडा येथे छापे टाकल्याची माहिती आहे.(NIA Raid) याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

माहितीनूसार एनआयए तपास संस्थेने आज सकाळी चार राज्यातील अनेक ठिकाणी छापे टाकले. यामध्ये बिहारमधील १२ ठिकाणी, उत्तर प्रदेशातील दोन ठिकाणी आणि पंजाबमधील लुधियाना आणि गोव्यातील प्रत्येकी एका ठिकाणाचा समावेश (Action by NIA) असल्‍याचे वृत्त ‘एनआयए’ने दिले आहे.

हेही वाचा

Back to top button