अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे; सातव्यादिवशीही मविआ आमदार आक्रमक | पुढारी

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे; सातव्यादिवशीही मविआ आमदार आक्रमक

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : विकासकामांना स्थगिती देणार्‍या सरकारचा धिक्कार असो… बळीराजाला मदत करा नाहीतर खुर्च्या खाली करा… अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे… जाहीर करा जाहीर करा नुकसान भरपाई जाहीर करा… शेतकऱ्यांची वीज तोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… सरकार तुपाशी शेतकरी उपाशी… अशा गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज (दि.९) विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा सातवा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

हेही वाचा : 

Back to top button