गॅस दरवाढीवरुन महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक; विधानभवनाच्या पायर्‍यांवर जोरदार घोषणाबाजी | पुढारी

गॅस दरवाढीवरुन महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक; विधानभवनाच्या पायर्‍यांवर जोरदार घोषणाबाजी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : होळी रे होळी, सरकारने थापली गॅस दरवाढीची पोळी.. संपला निवडणुकीचा तडाका, झाला गॅस दरवाढीचा भडका… रद्द करा रद्द करा… गॅस दरवाढ रद्द करा… खोके सरकार आले सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले… खोके सरकार आले गॅस दरवाढीचे विघ्न आणले… या सरकारचं करायचं काय, गरीबांच्या घरात जेवण नाय… शेतकऱ्यांची लाईट तोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… बळीराजाला द्या लाईट नाहीतर शेतकरी देईल फाईट.. अशा गगनभेदी घोषणांनी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.

अधिवेशनाच्या आज (दि.२) चौथ्या दिवशी विरोधक शिंदे सरकारच्या विरोधात आक्रमक झाले होते. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली गॅस दरवाढ विरोधात मविआ आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

हेही वाचा : 

Back to top button