ट्विटरची भारतातील दिल्ली, मुंबई कार्यालये होणार बंद : मस्क यांचा निर्णय | पुढारी

ट्विटरची भारतातील दिल्ली, मुंबई कार्यालये होणार बंद : मस्क यांचा निर्णय

पुढारी ऑनलाईन: नोव्हेंबर, २०२१ मध्ये भारतातील ९० टक्क्यांहून अधिक कर्मचारी कपातीनंतर, काही महिन्यांनी ट्विटरने शुक्रवारी (दि.१७) सकाळी देशातील तीनपैकी दोन कार्यालये बंद केल्याचे वृत्त ब्लूमबर्ग या वृत्त संस्थेने दिले आहे. परंतु ट्विटरचे सीईओ एलन मस्क किंवा ट्विटर कंपनीने याबाबत कोणतीही पुष्टी अद्याप केलेली नाही.

एलन मस्क यांनी 44 बिलियन डॉलरला ट्विटर टेकओव्हर केल्यानंतर मस्क यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यापैकी मस्क यांचा हा महत्त्वाचा निर्णय आहे. ट्विटरने भारतील तीन ट्विटर कार्यालयांपैकी दोन कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील नवी दिल्ली आणि मुंबई येथील ट्विटरची कार्यालये बंद होणार असून, केवळ बंगळूर येथील ट्विटर कार्यालय सुरू राहणार असल्याची माहिती मस्क यांनी दिली आहे.

ट्विटर हातात घेतल्यापासून मस्क यांनी कंपनी खर्चात कपात करण्याचे आणि ट्विटरचे आर्थिक आरोग्य सुधारण्याचे काम हाती घेतले. खर्च कपातीच्या दृष्टीने अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने गेल्या वर्षीच्या अखेरीस जागतिक स्तरावर सुमारे 50 टक्के कर्मचारी काढून टाकले आहेत. गेल्या वर्षभरात ट्विटरने भारतातील ९० टक्के म्हणजे 200 पेक्षा अधिक कर्मचार्‍यांना काढून टाकले आहे. तर भारतातील ट्विटरची दोन्ही कार्यालये बंद केल्यानंतर, कर्मचार्‍यांना घरूनच काम करण्यास सांगितले आहे. तर भारतातील ट्विटरचे सर्व काम हे दक्षिणेतून म्हणजेच बंगळुरू मधून सुरू राहणार असल्याचेही कंपनीने सांगितले आहे. कंपनी खर्च कपात करण्यासाठी मस्क यांनी हा निर्णय घेतल्याची यातून स्पष्ट होत आहे.

ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांनी 2023 मध्ये Twitter ला आर्थिकदृष्ट्या स्थिर करण्याच्या दृष्टीने जगभरातील ट्विटर  कर्मचारी कपात आणि ट्विटरची कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील दिल्ली आणि मुंबई कार्यालये बंद करण्याचा देखील हाच उद्देश असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

हेही वाचा:

Back to top button