Twitter News : ट्विटर युजर्सना मिळाला अधिकार; 1 फेब्रुवारीपासून खाते निलंबनाविरोधात आवाज उठवता येणार | पुढारी

Twitter News : ट्विटर युजर्सना मिळाला अधिकार; 1 फेब्रुवारीपासून खाते निलंबनाविरोधात आवाज उठवता येणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : टेस्ला आणि स्पेसएक्स या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) असलेले आणि  मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) ट्विटर युजर्सना ट्विटर वापरण्यात सुलभता यावी यासाठी नवनवीन बदल नेहमी करत असतात. अलिकडच्या काही काळात त्यांनी ट्विटरच्या बाबतीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. आज त्यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.  जगभरातील करोडो ट्विटर युजर्स आहेत. त्या सर्वांसाठी ही आनंदाची  बातमी आहे. आता ट्विटर युजर्सना आपल्या ट्विटर अकाउंट निलंबनाबाबत आवाज उठवता येणार आहे. हा अधिकार युजर्सना येत्या १ फेब्रुवारीपासून मिळणार आहे. वाचा सविस्तर बातमी. (Twitter News)

Twitter News : १ फेब्रुवारीपासून अधिकार 

एलॉन मस्क (Elon Musk) ट्विटरचे मालक झाल्यापासून ट्विटर बाबतीत महत्त्वपूर्ण निर्णय घेत आले आहेत. आता युजर्र्सना एक महत्वपूर्ण अधिकार दिला आहे. त्यांना आपल्या खात्याच्या निलंबनाविरोधात आवाज उठवता येणार आहे. कंपनीने शुक्रवारी सांगितले की ट्विटर वापरकर्ते 1 फेब्रुवारीपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या नवीन निकषांनुसार खाते निलंबनाचे आवाहन आणि मूल्यांकन करण्यास सक्षम असतील.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, नवीन निकषांनुसार, ट्विटर खाती केवळ गंभीर किंवा चालू असलेल्या आणि प्लॅटफॉर्मच्या धोरणांचे वारंवार उल्लंघन केल्याबद्दल निलंबित केले जातील. या गंभीर धोरणांमध्ये बेकायदेशीर साहित्य, कृती, हिंसा किंवा हानी, भडकावणे किंवा धमकावणे, वापरकर्त्यांचा छळ यांचा समावेश आहे. ट्विटरने म्हटले आहे की नवीन धोरणांतर्गत,  ट्विटर अकाउंट वापराबाबत कमी कठोर कारवाई केली जाईल. म्हणजे धोरण आणि नियमांचे उल्लंघन झाल्यास ट्विटची पोहोच मर्यादित करणे किंवा ट्विटर अकाउंट सुरू ठेवण्यापूर्वी युजर्सना नियमांचं उल्लंघन केलेले ट्विट काढून टाकण्यास सांगितले जाईल.

डिसेंबर २०२२ मध्ये ट्विटरने अब्जाधीशांशी संबंधित सार्वजनिक डेटा प्रकाशित करण्याच्या वादातून अनेक पत्रकारांची खाती निलंबित केली होती. मात्र, नंतर त्यांनी खाती पूर्ववत केली होती. तेव्हा मस्क यांच्या निर्णयाची चर्चा जगभर झाली होती.

हेही वाचा

Back to top button