अमेरिकेत गोळीबारात तीन नागरिक ठार; पाच जण जखमी | पुढारी

अमेरिकेत गोळीबारात तीन नागरिक ठार; पाच जण जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेतील मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये सोमवारी (दि.१३) रात्री झालेल्या गोळीबारात तीन नागरिक ठार झाले, तर पाच जण जखमी झाले. बर्की हॉल म्हणून ओळखल्या जाणार्‍या शैक्षणिक इमारतीजवळ आणि आयएम ईस्ट नावाच्या अॅथलेटिक सुविधा या दोन ठिकाणी गोळीबार झाला.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, शाळेच्या ईस्ट लान्सिंग कॅम्पसमध्ये रात्री ८ च्या सुमारास गोळीबार झाला. त्यानंतर एमएसयू पोलिसांनी विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगितले. मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीच्या प्रमुख ईस्ट लान्सिंग कॅम्पसमध्ये 50 हजार विद्यार्थी आहेत. घटनेनंतर ४८ तासांसाठी सर्व वर्ग आणि कॅम्पसचे उपक्रम रद्द करण्यात आले.

Back to top button