Aaron Finch : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंचची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा | पुढारी

Aaron Finch : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंचची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाचा T20I कर्णधार अ‍ॅरॉन फिंचने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. फिंचने याआधी १० सप्टेंबरला ‘वन डे’ मधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्याने न्यूझीलंडविरूद्धचा अखेरचा वन डे सामना खेळला होता. आता त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्तीची घोषणा केली आहे.

निवृत्तीची घोषणा करण्यापूर्वी फिंचने पाच कसोटी, 146 एकदिवसीय आणि 103 टी-20 सामने खेळून 254 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले. आयसीसीने फिंचच्या हवाल्याने सांगितले की, “2024 मध्ये होणाऱ्या पुढील टी-20 विश्वचषकापर्यंत मी खेळणार नाही, हे लक्षात घेऊन पद सोडण्याचा आणि संघाला त्या स्पर्धेसाठी योजना आखण्यासाठी आणि तयार करण्यासाठी वेळ देण्याची ही योग्य वेळ आहे. माझ्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत मला पाठिंबा देणाऱ्या सर्व चाहत्यांचे मला खूप खूप आभार मानायचे आहेत,” असे त्याने म्हटले आहे.

फिंचने जानेवारी 2011 मध्ये इंग्लंडविरुद्ध T20I मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले तेव्हापासून, फिंचने 8,804 धावा केल्या. 17 ODI शतके आणि दोन T20I शतकांचा यामध्ये समावेश आहे. त्याने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये वन डे मधून निवृत्तीची घोषणा केली होती. परंतु त्याने T20 मध्ये ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद चालू ठेवले. 2018 मध्ये हरारे येथे झिम्बाब्वे विरुद्ध फक्त 76 चेंडूत 172 धावा केल्या, तेव्हा त्याने सर्वोच्च T20I धावसंख्येचा विक्रम केला होता. त्याच्या या अप्रतिम खेळीत 10 षटकार आणि 16 चौकारांचा समावेश होता. 2020 मध्ये, त्याला ICC पुरुष T20I ‘क्रिकेटर ऑफ द डिकेड’ (Cricketer of the Decade award) पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. फिंचने 2013 मध्ये साउथ हॅम्प्टनमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 63 चेंडूत केलेल्या 156 धावा या T20I मधील आतापर्यंतची तिसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.

हेही वाचा :

 

Back to top button