Surya Kumar Yadav : सूर्याला कसोटीचे दार उघडणार? | पुढारी

Surya Kumar Yadav : सूर्याला कसोटीचे दार उघडणार?

नागपूर; वृत्तसंस्था : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारी रोजी नागपूर येथे होणार आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाचे कॉम्बिनेशन काय असेल, याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. टी-20 क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणार्‍या सूर्यकुमार यादवला कसोटी पदार्पण करण्याची संधी कधी मिळणार, याबाबत देखील त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. (Surya Kumar Yadav)

सूर्यकुमार यादव ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पदार्पण करण्याची शक्यता आहे. कर्णधार रोहित शर्मासमोर देखील ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत फिरकी गोलंदाजांना टॅकल करण्यासाठी दुसरा चांगला पर्याय नाही. रोहित शर्मा पुढील 3 कारणांमुळे सूर्यकुमार यादवला मालिकेतील पहिल्या कसोटीत पदार्पणाची संधी देण्याची शक्यता आहे. (Surya Kumar Yadav)

सूर्यकुमार यादवचा फॉर्म (Surya Kumar Yadav)

भारताचा 360 डिग्री फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या टी-20 क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याच्यासारखी फलंदाजी करणारा दुसरा फलंदाज शोधून सापडणार नाही. सूर्यकुमार यादव टी-20 मधील फॉर्म कसोटी क्रिकेटमध्ये देखील कायम राखू शकतो. तो नुकताच रणजी ट्रॉफीत देखील खेळला आहे. सूर्यकुमार यादव मधल्या फळीत फलंदाजी करतो. संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर विश्वास दाखवला तर तो नागपूरमध्ये कसोटी खेळताना दिसेल.

ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत फिरकीवर वार करण्याची क्षमता

मधल्या फळीत आक्रमक फलंदाजी करण्याची जबाबदारी ऋषभ पंत निभावत होता. मात्र, तो दुखापतीमुळे संघात नाही. त्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊ शकतो. तो टी-20 प्रमाणे कसोटीत देखील फिरकी गोलंदाजांच्या चिंधड्या उडवून देऊ शकतो.

सूर्याचे प्रथम श्रेणी रेकॉर्ड फर्स्ट क्लास

सूर्यकुमार यादवने टी-20 आणि आयपीएलमध्ये धडाकेबाज फलंदाजी केली आहे. मात्र, त्याचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील रेकॉर्ड देखील दमदार आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत 79 सामन्यांत 44.75 च्या सरासरीने 5549 धावा केल्या आहेत. यात 14 शतके, 28 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचा स्ट्राईक रेट 63.56 असून त्याने 200 धावांची सर्वोच्च खेळी केली आहे.

अधिक वाचा :

Back to top button