Gujarat Earthquake : गुजरातमध्ये भूकंपाचे धक्के; ४.२ रिश्टर स्केलच्या तीव्रतेनं हादरला कच्छ परिसर | पुढारी

Gujarat Earthquake : गुजरातमध्ये भूकंपाचे धक्के; ४.२ रिश्टर स्केलच्या तीव्रतेनं हादरला कच्छ परिसर

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात आज (दि.३०) सकाळी ४.२ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू जिल्ह्यातील दुधई गावापासून ११ किमी उत्तर-ईशान्य दिशेला होता. भूकंप विज्ञान अनुसंधान संस्थेने (ISR) ही माहिती दिली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

आयएसआरने दिलेल्या माहितीनुसार, कच्छ जिल्ह्यात आज सकाळी ६ वाजून ३८ मिनिटांनी ४.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू जिल्ह्यातील दुधई गावापासून ११ किमी उत्तर-ईशान्य दिशेला होता. पहिल्यांदा सकाळी ५ वाजून १८ मिनिटांनी ३.२ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. त्याचा केंद्रबिंदू कच्छ जिल्ह्यातील खवडा गावापासून २३ किमी पूर्व-दक्षिणपूर्वेस होता. अहमदाबादपासून सुमारे ४०० किमी अंतरावर असलेले कच्छ हे भूकंपाच्या उच्च जोखमीच्या क्षेत्रात आहे. तेथे नियमितपणे कमी तीव्रतेचे भूकंप होत असतात.

 

Back to top button