Kangana Ranaut Twitter : कंगणाचे ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरु; ती तिच्या पहिल्या ट्विटमध्ये म्हणते… | पुढारी

Kangana Ranaut Twitter : कंगणाचे ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरु; ती तिच्या पहिल्या ट्विटमध्ये म्हणते...

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावतवर बऱ्याचदा टीका टिपण्णी झाल्याचे पहायला मिळते. सध्या ती तिच्या विधानांमुळे नेहमी चर्चेत राहते. त्यामुळे तिला दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. सोशल मीडियाचे काही नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २०२१ मध्ये तिचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले होते. मात्र मंगळवारी (दि. २४) तिचे ट्विटर अकाऊंट पूर्ववत करण्यात आले आहे. त्यामुळे कंगणासाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. याबाबतची माहिती देत असणारे तिने एक ट्विट (Kangana Ranaut Twitter) देखील केले आहे.

कंगना रनौत की होगी ट्विटर पर वापसी, बोलीं- कुछ लोग इसे जादू टोना कहते हैं/kangana ranauts twitter account may active in somedays actress said i predict things which are going to happen

तनू वेड्स मनु रिटर्न्स आणि मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी यासारख्या चित्रपटांमध्ये तिच्या अभिनयासाठी तब्बल चार राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारी ही अभिनेत्री तिच्या मतांबद्दल खूप बोलकी आहे. सार्वजनिक कार्यक्रमात किंवा सोशल मीडियावर ती जी विधाने करते, त्यावर अनेकदा टीकाही झालेल्या पहायला मिळतात. पण यामुळे ती थांबली नाही. तिने मायक्रो-ब्लॉगिंग साइटच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणारी ट्वीट्सची मालिका सुरुच ठेवली होती. या पोस्टमुळे 2021 मध्ये तिचे ट्विटर अकाऊंट कायमचे निलंबित करण्यात आले. मात्र, आता ते पूर्ववत करण्यात आले आहे. (Kangana Ranaut Twitter)

Kangana Ranaut says what a woman wears or forgets to wear is her business | Bollywood - Hindustan Times

कंगना राणावतचे पहिले ट्विट

कंगना राणावतचे ट्विटर अकाऊंट मे 2021 मध्ये बंद करण्यात आले होते. आता तिचे अकाऊंट पुन्हा सुरु झाल्याने ती आता या मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइटवर परत आली आहे. कंगणाने तिच्या या पुनरागमनाची घोषणा करत असल्याचे एक ट्विट देखील पोस्ट केले आहे ज्यामध्ये लिहिले आहे की, “सर्वांना नमस्कार, येथे मी परत आल्याने आनंद झाला”

EXCLUSIVE: Kangana Ranaut - Would've preferred Rangoon to release in 2016 to distract everyone's mind! | PINKVILLA

तिने तिच्या या ट्विटमध्ये आगामी चित्रपट ‘इमर्जन्सी’ बाबत काही माहिती दिली आहे. या चित्रपटाची घोषणा केल्याचे सुचक ट्विटमधून ती म्हणते की, ”इमर्जन्सीचे चित्रीकरण यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे” 20 ऑक्टोबर 2023 रोजी या चित्रपटासोबत सिनेमागृहात भेटू. अशा आशयाचे हे ट्विट आहे.

Kangana Ranaut shares bold photos in green short dress troll says it is not  indian culture - कंगना रनौत ने शॉर्ट ड्रेस में शेयर की बोल्ड Photos, देखकर  ट्रोल्स बोले- ये भारतीयKangana Ranaut makes heads turn in Tarun Tahiliani: Yay or Nay? | PINKVILLA

कंगणा पुन्हा ट्विटरवर सक्रीय

या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या सोशल मीडियावर चर्चा जोरदार पहायला मिळतात. बऱ्याचदा तिने केलेल्या मीम्स मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे दिसून येते. त्यामुळे कंगणाचे ट्विटर अकाऊंट पूर्ववत झाल्यानंतर आता ती तिचे मत मांडण्यासाठी पुन्हा सक्रीय दिसून येणार आहे. यामुळे सोशल मीडियावर पुन्हा तिच्या मत मतांतराच्या तोफ धडाडणार हे चित्र स्पष्ट आहे.

Kangana Ranaut Goes Bold in a Black Dress With Dangerously Plunging  Neckline For Dhaakad Trailer - See Bold Pics

हेही वाचा

Back to top button