‘सीए’त नाशिकचे विद्यार्थी चमकले; अंतिम परीक्षेत सेजल जैन, तर इंटरमिजिएटमध्ये स्नेहा लोढा शहरात प्रथम | पुढारी

'सीए'त नाशिकचे विद्यार्थी चमकले; अंतिम परीक्षेत सेजल जैन, तर इंटरमिजिएटमध्ये स्नेहा लोढा शहरात प्रथम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया अर्थात ‘आयसीएआय’ने सन २०२२ नोव्हेंबरमध्ये घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.१०) अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला. या परीक्षेत नाशिकचे विद्यार्थी चमकले आहेत. अंतिम परीक्षेत सेजल जैन हिने ४९९ गुणांसह नाशिकमधून पहिला क्रमांक पटकावला आहे. तर सीए इंटरमिजिएट परीक्षेत नाशिकमधून स्‍नेहा लोढा हिने ६२२ गुणांसह प्रथम तर देशात २३ वा क्रमांक मिळविला आहे. सिद्धेश मुदगिया हा ६१५ गुणांसह नाशिकमध्ये दुसरा व देशात ३० व्या स्थानी राहिला.

यंदा नोव्‍हेंबर २०२२ मध्ये सीए इंटरमिजिएट या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेत स्‍नेहा लोढा हिने ६२२ गुण मिळवताना पहिला क्रमांक मिळविला. सिद्धेश मुदगिया याने ६१५ गुण मिळवून व्दितीय, तर प्रांजली कुलकर्णीने ५८७ गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला. पार्थ धांडे (५८२ गुण) तर राहुल सिंघ (५७६ गुण) यांनी यश संपादन केले. या परीक्षेला दोन्‍ही गट मिळून ३८३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ६५ विद्यार्थ्यांनी दोन्‍ही गटांत, ७८ विद्यार्थ्यांनी पहिल्‍या गटातून तर दोन विद्यार्थ्यांनी दुसऱ्या गटातून बाजी मारली. दरम्यान, नोव्‍हेंबर २०२२ मध्ये झालेल्‍या चार्टर्ड अकाउंटंट्‌सच्‍या अंतिम परीक्षेत नाशिकमधून सेजल जैन हिने ४९९ गुण मिळवत नाशिकमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तर जस्‍पिनदर्दिप संघा याने ४९३ गुणांसह दुसरा तर अथर्व साल्‍सिंगिकर ४७३ गुणांसह तिसरा क्रमांक मिळविला. संजना सोनार हिला ४६१ गुणांसह चौथ्या तर यशराज शिंगीला ४५४ गुणांसह पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

दोन्ही गटांतून २४ विद्यार्थ्यांचे यश
यंदा सनदी लेखापाल परीक्षा (सीए) २०२२ नोव्हेंबरमध्ये घेण्यात आल्या होत्या. नाशिकमधून या परीक्षेसाठी २२४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २४ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. दोन्‍ही गटांपैकी पहिल्या गटात २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, दुसऱ्या गटात २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. फक्‍त पहिल्‍या गटासाठी परीक्षा दिलेल्‍या २९६ विद्यार्थ्यांमध्ये ७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. फक्‍त दुसरा गट दिलेल्या २९३ विद्यार्थ्यांमध्ये ६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. असे एकूण परीक्षेला बसलेल्‍या ८१३ विद्यार्थ्यांतून २०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

यंदाच्या निकालात मुलींची कामगिरी अभिमानास्पद आहे. नाशिकची एका विद्यार्थीनीने देशात तिसरा क्रमांक उत्तीर्ण होत नवा आदर्श निर्माण केला आहे. पूर्वी सीए करण्यासाठी विद्यार्थी मुंबई पुणे या ठिकाणी जात होत. मात्र, आता नाशिकमध्ये उत्कृष्ट मार्गदर्शन उपलब्ध झाले आहे. मागील परीक्षेच्या तुलनेने यंदा निकाल काहीसा घसरला आहे. – प्रा. सीए. लोकेश पारख, सरचिटणीस, जिल्हा कोचिंग क्लासेस चालक संघटना.

यांनी मारली बाजी…
गौतमी छाजेड
स्नेहल हिरे
प्रियंका भालेराव
रोशनी कोचर
सेजल जैन
हर्षदा अमृतकर
साक्षी पंडित
खुशबू खिवसरा
कल्पिता बाफना

हेही वाचा :

Back to top button