जिल्हा मजूर संघटना निवडणूक : जिल्हा मजूर संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद भाबड यांची निवड | पुढारी

जिल्हा मजूर संघटना निवडणूक : जिल्हा मजूर संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद भाबड यांची निवड

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्हा मजूर फेडरेशन अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी आज मंगळवार (दि.10) निवडणूक झाली. यावेळी झालेल्या चुरशीच्या लाढाईत नांदगावचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या नेतृत्वात आमदारांचे खंदे समर्थक प्रमोद भाबड यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे.

जिल्हा मजूर संघाच्या संचालक पदासाठी गेल्या महिन्यात निवडणूक घेण्यात आली. तर यावेळी २० जागांपैकी ८ जागा बिनविरोध झाल्याने उर्वरित १२ जागांसाठी मतदान घेण्यात आले होते. मंगळवार (दि.10) रोजी पार पडलेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मोठी चुरस होती. यात प्रमोद भाबड यांना १२ मते तर इगतपुरीचे ज्ञानेश्वर लहाने यांना ८ मते मिळाल्याने प्रमोद भाबड यांची बहुमताने अध्यक्षपदी निवड झाली. तसेच संघाच्या उपअध्यक्ष पदी शर्मिला कुशारे यांची निवड झाली आहे. यावेळी आमदार सुहास अण्णा कांदे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, विष्णू निकम, नगराध्यक्ष राजेश कवडे, आनंद कासलीवाल, राजेंद्र पवार, योगेश पाटील, राजेंद्र भोसले, केदा आहेर, साईनाथ गिडगे, तेज कवडे, किशोर लहाने, किरण देवरे, मयुर बोरसे, अमोल नावंदर, डॉ. सांगळे, राजेंद्र देशमुख, संजय आहेर, अनिल रिंढे, दशरथ लहिरे, पंकज जाधव, जिल्हा मजूर संघाचे सर्व संचालक मंडळ तसेच उपस्थितांनी नवनियुक्त अध्यक्ष प्रमोद भाबड यांच्या निवडीचे स्वागत केले.

हेही वाचा:

Back to top button