School : ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार; मुख्यमंत्र्याची परवानगी  | पुढारी

School : ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार; मुख्यमंत्र्याची परवानगी 

मुंबई, पुढारी ऑनलाईन : मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद होत्या. मात्र, कोरोना नियमांचं पालन करून ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याची परवानगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी मोठी बातमी ठरलेली आहे.

यासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड माध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या की, “४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. शाळा आणि महाविद्यालयं सुरू करण्यासंदर्भात टास्क फोर्सने नव्या सुचना दिलेल्या आहेत. ग्रामीण भागात पाचवी ते बारावी वर्ग सुरू होणार आहेत. शहरी भागात आठवी ते बारावी वर्ग सुरू होणार आहे. तसेच शाळेंमध्ये कुठल्याही खेळाला परवानगी देण्यात आली आहे”, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

गायकवाड पुढे म्हणाल्या की, “शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती सक्तीची नाही आणि वर्गा उपस्थितीसाठी पालकांची समंती सक्तीची आहे. शाळेसंदर्भात सर्व अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आलेले आहेत. मुलांचं मानसिक आरोग्य जपण्याच्या सूचना टास्कफोर्सनं दिलेल्या आहेत”, अशी माहिती शालेय मंत्र्यांनी स्पष्ट केली. या आधीच चाइल्ड टास्क फोर्सकडून राज्य शासनाला मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या. संबंधिच जिह्यातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन शाळेसंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाकडे देण्यात आला आहे.

पहा व्हिडीओ : ‘बेगम’ अनुजाला सासर आवडतं की माहेर

Back to top button