Russia-Ukraine war : 'युद्धातून राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की अन् युक्रेनच्या नागरिकांनी काय साध्य केले?...' -जो बायडेन | पुढारी

Russia-Ukraine war : 'युद्धातून राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की अन् युक्रेनच्या नागरिकांनी काय साध्य केले?...' -जो बायडेन

पुढारी ऑनलाईन:  रशियाच्या हल्ल्यानंतर आज पहिल्यांदाच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की हे अमेरिका दौऱ्यावर आहेत. भेटी दरम्यान ज्यो बायडेन यांनी युक्रेनसाठीच्या सुरक्षेसाठी मदत जाहीर करत, युक्रेनसोबत शेवटपर्यंत उभे राहण्याचे आश्वासन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना दिले. यावेळी बोलताना राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि युक्रेनच्या नागरिकांनी या युद्धातून काय साध्य केले? हे संपूर्ण जगासाठी महत्त्वाचे असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे.

पुढे ते म्हणाले, अमेरिका आणि युक्रेन हे दोन्ही देश मिळून स्वातंत्र्याची ज्योत तेवत ठेवतील. या युद्धरूपी अंधारावर पुन्हा प्रकाश विजय मिळवेल. तसेच ‘तुम्ही कधीही एकटे नाहीत, आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी’ असल्याचेही त्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना सांगितले.

भेटी दरम्यान ज्यो बायडेन यांनी युक्रेनसाठीच्या सुरक्षेसाठी मदत जाहीर करण्यात आली. यामध्ये विविध उपकरणे आणि दारूगोळा याचा प्रामुख्याने समावेश आहे. तसेच यामधील Patriot missile battery याच्या माध्यमातून युक्रेनची हवाई यंत्रणा भक्कम होण्यास मदत होणार असून, याच्या वापराचे प्रशिक्षण आम्ही सैन्यांना देऊ, असे देखील बायडेन यांनी स्पष्ट केले. झेलेन्स्की यांना अमेरिकेकडून क्षेपणास्त्र प्रणालीसोबत भक्कम पाठींबा देखील मिळाला आहे.

पुढे बोलताना राष्ट्राध्यक्ष बायडेन म्हणाले, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला करून आज ३०० दिवस पूर्ण झालेत. रशियाच्या अन्यायाविरूद्धच्या या युद्धात ते कधीच एकटे नाहीत. या लढाईत आम्ही शेवटपर्यंत युक्रेनच्या पाठीशी उभे आहोत. या युद्धात कितीही वेळ लागू, तोपर्यंत आम्ही पाठींबा देण्यास वचनबद्ध असल्याचेही ज्यो बायडेन यांनी स्पष्ट केले.

युक्रेन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी मानले आभार

मला दिलेल्या आदरातिर्थ आणि पाठींब्यासाठी मी अमेरिका आणि अमेरिकन नागरिकांचे आभार मानतो. मला विश्वास आहे की, आपण दोन्ही देश एकत्र येऊन दोन्ही देशासाठी एक चांगले, समृद्ध आणि सुरक्षित भविष्य निर्माण करू. युक्रेनचा विजय हा अमेरिकेचा विजय असेल असेही झेलेन्स्की म्हणाले.

हेही वाचा:

Back to top button