पुढारी ऑनलाईन डेस्क : रशिया युक्रेनवर अण्वस्त्र हल्ला करण्याच्या शक्यतेने जग भयभीत झाले असताना, आता रशियानेच युक्रेनवर अण्वस्त्रे तयार करण्यासाठी पाकिस्तानची मदत घेतली जात असल्याचा थेट आरोप केला आहे. युक्रेनच्या एका शिष्टमंडळाने यासंदर्भात पाकिस्तानचा दौराही केल्याचे रशियाचे म्हणणे आहे. रशियाच्या वित्तीय धोरण समितीचे सदस्य इगोर मोरोझोव्ह यांनी एका पत्रकार परिषदेत हा खळबळजनक आरोप केला. ते म्हणाले की, पाकिस्तानच्या मदतीने अण्वस्त्रे तयार करण्याचा घाट युक्रेनने घातला असून, त्याबाबत वेगवान हालचालीही सुरू आहेत. (Russia-Ukraine War)
पहिल्या टप्प्यात युक्रेनचे एक शिष्टमंडळ पाकिस्तानला जाऊन आले. त्यानंतर पाकिस्तानी तज्ज्ञांचे एक शिष्टमंडळही युक्रेनला गेले होते. त्यात अण्वस्त्रनिर्मितीसाठी लागणारे तंत्रज्ञान देण्याबाबत बोलणी झाल्याचा आरोप त्यांनी केला. आपल्याच भूभागावर 'डर्टी बॉम्ब' टाकून रशियाच्या नावाने खापर फोडण्याची युक्रेनची रणनीती दिसते. 'डर्टी बॉम्ब' तयार करण्याची युक्रेनकडे क्षमता असून, त्याची पूर्वतयारीही त्यांनी सुरू केल्याचा थेट आरोप त्यांनी केला. (Russia-Ukraine War)
हेही वाचा