Russia-Ukraine War : भारतीय नागरिकांना पुन्हा युक्रेन सोडण्याचे आवाहन

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय दूतावासाने बुधवारी जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात युक्रेनमधील भारतीय नागरिकांना एक युक्रेन सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. लवकरात लवकर भारतीय नागरिकांना पुन्हा युक्रेन सोडण्याचे आवाहन या प्रसिद्धीपत्रकात केले आहे. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्ष अधिक तीव्र होत चालला असल्याने हा सल्ला देण्यात आला आहे. त्याचबरोबर युक्रेनमध्ये अनावश्यक फिरणे टाळावे याबाबत देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत. (Russia-Ukraine War)
फेब्रुवारीमध्ये सुरू झालेल्या संघर्षाच्या सुरुवातीला रशियाने युक्रेनची राजधानी कीववर मिसाइल हल्ले केले होते. युक्रेनने देखील याला सडेतोड उत्तर दिले. त्यानंतर एप्रिल दरम्यान रशियाने कीवमधून सैनिक परत बोलावून घेतले. पण आता पुन्हा एकदा रशियाने किववर हल्ले करण्यास सुरूवात केली आहे. (Russia-Ukraine War)
याआधी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेन मधील संघर्ष वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. युक्रेनमधील नागरिक या संघर्षामुळे त्रस्त आहेत. त्यामुळे भारतीय नागरिकांना केलेल्या आवाहानाद्वारे सूचना करण्यात आले आहेत.
Advisory for Indian Nationals@MEAIndia @DDNewslive @DDNational @PIB_India @IndianDiplomacy pic.twitter.com/bu4IIY1JNt
— India in Ukraine (@IndiainUkraine) October 19, 2022
हेही वाचा
- Putin Declares Martial Law : रशियाकडून युक्रेनच्या 4 भागात ‘मार्शल लॉ’ लागू! पुतिन यांची घोषणा
- Occupancy Certificate : इमारतीच्या भोगवटा प्रमाणपत्रासाठी ‘वॉटर कनेक्शन’ सक्तीचे : मुंबई पालिकेचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
- उमर खालीद : CAA/NRC विरोधातील आंदोलन प्रथमदर्शनी ‘दहशतवादी’ कृत्य – दिल्ली उच्च न्यायालय
- Stock Market Updates | शेअर बाजारात तेजी कायम, पण डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण
- T20 World Cup 2022 : कपिल देव यांचे धक्कादायक भाकित, “टीम इंडिया सेमीफायनलपर्यंत…”