भारतात वाढत आहे सायबर क्राईम | पुढारी

भारतात वाढत आहे सायबर क्राईम

नवी दिल्‍ली : नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोकडून प्रसिद्ध करण्यात आलेली सायबर क्राईमबाबतची आकडेवारी देशाचे लक्ष वेधून घेत आहे. या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की गतवर्षी देशात सर्वाधिक सायबर गुन्ह्यांची नोंद झाली. 2019 मध्ये सायबर क्राईमची सुमारे 44,546 प्रकरणे समोर आली.

सन 2018 मध्ये या गुन्ह्यांची संख्या सुमारे 28,248 होती. याचा अर्थ सायबर क्राईममध्ये गेल्यावर्षी 64 टक्क्यांची वाढ झाली. सन 2017 मध्ये सायबर क्राईमची 21,796 प्रकरणे होती. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात ही प्रकरणे अधिक आहेत. देशातील शहरी भागातील सायबर क्राईममध्ये 82 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2018 मध्ये शहरांमधील सायबर गुन्ह्यांची संख्या 18,732 होती. गेल्यावर्षी सर्वाधिक सायबर गुन्हे कर्नाटकात नोंदवण्यात आले आहेत. त्याठिकाणी बारा हजारांपेक्षाही अधिक गुन्हे नोंदवले आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशचा क्रमांक असून तिथे सुमारे 11,416 सायबर गुन्हे नोंदवले आहेत. महाराष्ट्रात सुमारे 5 हजार सायबर गुन्ह्यांची नोंद झाली. मुंबईत सायबर गुन्ह्यांमध्ये 45 टक्क्यांनी वाढ झाल्याचेही दिसून आले.

Back to top button