Dr. Jaysingrao Pawar: राज ठाकरे भेटीवर डॉ. जयसिंगराव पवार यांचा खुलासा; म्हणाले, बाबासाहेब पुरंदरेंवरील टीकेवर मी आजही ठाम... | पुढारी

Dr. Jaysingrao Pawar: राज ठाकरे भेटीवर डॉ. जयसिंगराव पवार यांचा खुलासा; म्हणाले, बाबासाहेब पुरंदरेंवरील टीकेवर मी आजही ठाम...

पुढारी ऑनलाईन डेस्क :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी ते ज्येष्ठ इतिहास संशोधक, लेखक डॉ. जयसिंगराव पवार  (Dr. Jaysingrao Pawar) यांची बुधवारी (दि. ३० नोव्हेंबर) भेट घेतली. या दरम्यान झालेली चर्चा आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरुन केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली. अनेक संभ्रम निर्माण झाले. सोशल मीडियावरही चर्चा होऊ लागली. या भेटीवरुन झालेल्या संभ्रमावरून डॉ. जयसिंगराव पवार यांनी पत्र लिहित खुलासा केला आहे. हे पत्र राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही ट्विट करत शेअर केले आहे.

Dr. Jaysingrao Pawar : कोकण दौरा 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. त्यांनी या दौऱ्याची सुरुवात करवीर निवासिनी अंबाबाई देवीचं दर्शन घेऊन केली. यावेळी त्यांनी ज्येष्ठ इतिहास संशोधक, लेखक डॉ. जयसिंगराव पवार यांचीही भेट घेतली. या दरम्यान झालेल्या चर्चेवरुन अनेक संभ्रम निर्माण झाले. सोशल मीडियावरुन सोशल मिडियावरही चर्चा होऊ लागली. या भेटीवरुन झालेल्या संभ्रमावर डॉ. जयसिंगराव पवार यांनी पत्र लिहित खुलासा केला आहे.

Dr. Jaysingrao Pawar

राज ठाकरे यांनी या भेटीचे ट्विट करत सांगितले की, “ज्येष्ठ इतिहास संशोधक, लेखक डॉ. जयसिंगराव पवार यांची आज कोल्हापूर येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मरहट्ट्यांच्या गनिमी काव्यापासून अनेक विषयांवर चर्चा झाली. महाराष्ट्राचा इतिहास सरांच्या तोंडून ऐकण्याचा योग आज अमितला पण आला ही विशेष आनंदाची बाब.” राज ठाकरे आणि जयसिंगराव पवार यांच्या या भेटीची खूप चर्चा झाली. जयसिंगराव पवार यांनी याबाबत खुलासा केला आहे. खुलासा डॉ. जयसिंगराव पवार यांच्या शब्दात आहे तसा.

बाबासाहेब पुरंदरेंवर काहीही चर्चा झाली नाही…

श्री.राज ठाकरे यांच्या भेटीसंबंधी खुलासा

श्री. राज ठाकरे यांच्या कोल्हापूर दौ-यामध्ये माझी भेट घेण्याची त्यांनी व्यक्त केली. त्यानुसार ते माझ्या  निवासस्थानी आले. तेव्हा इतिहासातील विविध विषयांवर चर्चा झाली. त्यावेळी प्रत्यक्ष इतिहास आणि त्याचा चित्रपटांतून होणारा विपर्यास यावर चर्चा झाली. मी प्रबोधनकार ठाकरे यांच्या कार्याला उजाळा देऊन आजच्या काळाच्या संदर्भात त्यांच्या कार्याचे महत्व विशद केले. प्रबोधनकारांचा विचार घेउन मुख्यमंत्री म्हणून सत्तेत आल्यावर आपण महाराष्ट्रात धडाकेबाज काम कराल त्याचे मी स्वागत करेन, असे मी म्हणालो. माध्यमामध्ये या विधानाची अतिशयोक्ती झाली. यावेळी त्यांच्याशी बाबासाहेब पुरंदरेंवर काहीही चर्चा झाली नाही

श्री. राज ठाकरे निघून गेल्यावर पत्रकारांनी पुरंदरें-बहुल प्रश्न विचारल्यावर मी त्यांचा इतिहासकार म्हणून गौरवीकरण करणारे विधान केलेले नाही. कारण आतापर्यंत लिखाणातून व संशोधनातून पुरंदरे यांच्या विकृत व अनैतिहासिक मांडणीवर अभ्यासपूर्ण टिका केली आहे, आणि त्यावर आजही ठाम आहे. या संदर्भात वृत्तपत्रांत प्रसिद्ध बातम्यामुळे माझ्या वैचारिक भूमिकेबद्दल संभ्रम निर्माण होत आहे. म्हणून मी हा खुलासा देत आहे. यास प्रसिद्धी द्यावी, ही विनंती डॉ. जयसिंगराव पवार..

Jaysingrao Pawar

ज्येष्ठ इतिहास संशोधक,लेखक जयसिंग पवार यांचा खुलासा

हेही वाचा 

Back to top button