Shraddha DNA Test : जंगलात सापडलेले अवयव श्रद्धाचेच : अवयवाचे DNA वडिलांच्या DNA शी जुळले

पुढारी ऑनलाईन : श्रद्धा वालकर हत्याप्रकरणातील मोठी बातमी समोर आली आहे. ( Shraddha DNA Test ) जंगलात सापडलेले मृतदेहाचे अवशेष हे श्रद्धा वालकर हिचेच फॉरेन्सिक विभागाने आपल्या प्राथमिक माहितीमध्ये स्पष्ट केले आहे. श्रद्धा आणि तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताब राहत असलेल्या फ्लॅटवरील श्रद्धाच्या रक्ताचे डाग आणि जंगलात मिळालेल्या हाडांचा डीएनए तिच्या वडिलांच्या रक्ताच्या नमुन्याशी जुळाला आहे, अशी तोडी माहिती फॉरेन्सिक विभागाने दिल्ली पोलिसांना दिली आहे. काही दिवांमध्ये डीएनए चाचणीचा संपूर्ण अहवाल दिला जाईल, असे फॉरेन्सिक विभागाने दिल्ली पोलिसांना कळवले आहे.
Shraddha DNA Test : फॉरेन्सिक विभागाची प्राथमिक माहिती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा वाडकर हत्याप्रकरणी तिचे वडील विकास वालकर यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. तिच्या वडिलांचे रक्ताच्या नमुन्याशी फ्लॅटमधील श्रद्धाच्या रक्ताचे डाग आणि हाडे यांचे डीएनए जुळले असल्याची प्राथमिक माहिती फॉरेन्सिक विभागाच्या टीमने पोलिसांना दिली आहे . सूत्रांच्या माहितीनुसार याप्रकरणातील ‘डीएनए’चा संपूर्ण अहवाल येण्यासाठी काही दिवस लागतील, असेही फॉरेन्सिक विभागाने स्पष्ट केले आहे.
प्राथमिक तपासात श्रद्धाच्या हत्येची पुष्टी झाली आहे. या प्रकरणी डीएनए चाचणी अहवाल पोलिसांना मिळालेला नाही, असे पोलीस अधीक्षक सागरप्रीत हुडा यांनी दिली.
Shraddha murder case | DNA test report (of victim’s body parts) has not been received by the police: Sagar Preet Hooda, Special CP (Law & Order), Delhi Police
— ANI (@ANI) November 26, 2022