Shraddha Murder Case : आफताबने दोन वर्षांपूर्वीच श्रद्धाला दिली होती तुकडे करण्याची धमकी | पुढारी

Shraddha Murder Case : आफताबने दोन वर्षांपूर्वीच श्रद्धाला दिली होती तुकडे करण्याची धमकी

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रद्धा वालकर (Shraddha Murder Case) खून प्रकरणी दररोज धक्‍कादायक खुलासे समोर येत आहेत. २०२० मध्येच आफताब  हत्या करेल, अशी भीती श्रद्धा वालकरने व्यक्त केली होती. आफताबने श्रद्धाला मारहाण केली होती. त्यानंतर २३ नोव्हेंबर २०२० रोजी श्रद्धाने पोलिसांत तक्रार केली. आफताबने तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच शरीराचे तुकडे करेन, अशी धमकीही दिली होती, असे  श्रद्धाने मुंबईतील एका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्‍हटलं होतं.

आफताब मला मारहणा करतो, याची माहिती त्‍याच्‍या कुटुंबीयांना होती, असे श्रद्धाने तक्रारी म्‍हटलं होते. श्रद्धाने (Shraddha Murder Case) तक्रारीत म्‍हटलं होते की, “आफताब तिला ब्लॅकमेल करायचा आणि जीवे मारण्याची धमकी देत ​​असे. आठवड्याच्या शेवटी आफताबचे कुटुंबीय त्याला भेटायला येत असे. आम्ही एकमेकांशी लग्न करण्याचा विचार केला आहे. म्हणून मी तिच्यासोबत राहत असल्याचे त्याने कुटुंबीयांना सांगितले होते.”

दरम्‍यान, दिल्ली पोलिसांनी आफताब पूनावाला यांच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवले आहेत. पोलिसांनी आफताबच्या कुटुंबीयांची चौकशी केली. यादरम्यान, आफताब आणि श्रद्धाचे नाते काय होते, हे त्यांना माहीत आहे का? आफताब पूनावाला श्रद्धाची हत्या करून मुंबईला परतला का, की त्याने याबाबत काही सांगितले का, अशी विचारणाही पोलिसांनी कुटुंबीयांना केली. आफताबचे कुटुंब तेथून शिफ्ट झाले, तेव्हा आफताबही तेथे होता. कोणत्या परिस्थितीत त्याने आपले निवासस्थान बदलण्याचा निर्णय घेतला, अशी विचारणा पोलिसांनी चौकशी दरम्यान केली.

आफताब पूनावाला याला १२ नोव्हेंबर रोजी श्रद्धाच्‍या हत्‍या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अटक केली. मे महिन्‍यात आफताबने श्रद्धाचा गळा दाबून खून केला. यानंतर शरीराचे सुमारे ३५ तुकडे केले. सुमारे तीन आठवडे ते घरी ३०० लिटरच्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले. यानंतर अनेक दिवस जंगलात फेकून दिले होते. दरम्यान, आफताबची नार्को टेस्ट केली जाणार असून, त्याआधी पॉलीग्राफ चाचणी केली जाणार आहे. त्यासाठी न्यायालयाने परवानगीही दिली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button